नव्या कापसाला(Cotton) १२ हजाराचा दर ?
देशात सध्या कापसाचे( Cotton)दर फार तेजीत आहेत. महाराष्ट्रात कापूस बाजारात यायला अजून वेळ आहे आणि परंतु उत्तर भारतात कापूस ( Cotton)लागवड लवकर होत असते. त्यामुळे तेथील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झालीय आहे. या नवीन कापसाला चांगला दर मिळत आहे. हरियाणातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस( Cotton) दाखल झाला आहे. त्यानंतर पंजाबमध्येही काही बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे. आता गुजरातमध्येही मोजक्या बाजारांमध्ये नवीन कापसाच्या( Cotton) लिलावाचा मुहुर्त पार पडलाय आणि गुजरातमधील अमरेली, गोंडल आणि राजकोटमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक सुरू झालीय आहे. राजकोट बाजारात कापसाला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळात आहे.
हे हि वाचा : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटली, नवीन यादीत तुमचं नाव ‘असं’ करा चेक
तर गोंडल बाजारात १० हजार ते १२ हजार ६०० रुपयाने व्यवहार झाले आह. तर जुन्या कापसालाही( Cotton) १२ हजार रुपयांचा दर मिळतोय आणि सध्या बाजारात आवक खूपच कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटी ( Cotton)बाजारातील आवक वाढेल आणि बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरच दर काय राहतील, याचा अंदाज येईल, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यंदा कापूस लागवड वाढलेली असली तरी पिकाचं मोठं नुकसान होतं आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसलाय आहे. तर गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे कापूस उत्पादनात गेल्या वर्षीच्या( Cotton) तुलनेत वाढ होण्याची शक्यता नाही. या सगळ्या गोष्टींमुळे कापसाचे दर यंदा चढे राहण्याचा अंदाज वक्त केला आहे. कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Bazar rate