Organic Farming: सेंद्रिय शेती 2022 - डिजिटल शेतकरी

Organic Farming: सेंद्रिय शेती 2022

Organic Farming: भारतामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे आणि  १९६० पर्यंत भारतीय शेतकरी या शेतीवर अवलंबून होता ती सेंद्रिय शेतीच होती. हरित क्रांतीपासून रासायनिक खते,बुरशीनाशके, किटकनाशके, तणनाशके व संजिवके यांचा भरमसाठ वापर झाला आहे. जनावरांच्या दुधासाठी संप्रेरके वापरण्यास सुरुवात झाली आणि त्याच्या वापरामुळे देशाच्या एकूण उत्पादनात भरीव वाढ झाली आहे. रासायनिक खतांचा पीक उत्पादन वाढीसाठी होणाऱ्या फायद्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापराकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. Organic Farming

अलिकडच्या काळात जमिनीच्या आरोग्यावर परीणाम होऊन उत्पादीत मालाच्या प्रतीवरही परिणाम झाला आहे. मानवावर आणि पशुपक्षी यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम जाणवू लागले आहे. गेल्या दोन दशकात पशुधनामध्ये घट होत असल्याने एकूण शेणखताची उपलब्धता सातत्याने कमी होत गेली आणि अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी ऊस, कापूस, गहू, भाजीपाला पिके आणि फळबागांना आवश्यकतेपेक्षा जास्त खते आणि पाण्याचा वापर करण्यात आला. या पध्दतीने उत्पादन खर्चात वाढ तर झालीच पण त्याचबरोबर जमिनीची रासायनिक, भौतिक आणि जैविक गुणवत्ता कमी होत गेली आहे. Organic Farming

उष्ण हवामानामुळे महाराष्ट्राच्या जामिनीत सेंद्रिय कर्बाचा हास झपाट्याने होत आहे आणि त्याचे जामिनीतील प्रमाण ०.२-०.५% इतके दिसून येत आहे. या सर्व प्रश्नांवर जामिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कसे वाढविता येईल हाच पर्याय शिल्लक राहत आहे. सातत्याने अधिक उत्पादन देणारी ठराविक पिकेच वर्षानुवर्षे त्याच जमिनीत घेतली गेल्याने काही नवीन रोग आणि किडी या पिकांवर दिसू लागल्या आहे. आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये सर्व प्रकारची रासायनिक खते आणि औषधांचा वापर पूर्णपणे बंद करुन सेंद्रिय पदार्थांचाच वापर केला जातो. Organic Farming

 अन्नद्रव्य व्यवस्थापन

सेंद्रिय शेतीसाठी शेणखत, कंपोस्ट खत, कोंबडी खत, लेंडी खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत या भरखतांचा आणि अखाद्य पेंडीचा जोरखतासाठी वापर करता येत असतो. सेंद्रिय शेतीत उपयुक्त जीवाणूचे प्रमाण वाढविण्यासाठी रायझोबियम, अँझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, अॅसिटोबॅक्टर, स्फूरद विरघळविणारे जीवाणू या जीवाणू खतांचा पिकानुसार पूरक खते म्हणून वापर केल्याने उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होत असते. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीत योग्य पिक पद्धतीचा अवलंब केल्याने जमिनीचा पोत सुधारुन आर्थिक फायदा होत असतो. सेंद्रिय शेतीत पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे लागते आणि त्याचबरोबर विविध जैविक द्रावणांचा, जीवामृत, ई.एम., गांडूळ पाणी, गोमुत्र इत्यादींचा वापर सेंद्रिय शेतीत करणे शक्य होत आहे.तसेच याशिवाय जैविक पीक संरक्षण शिफारसीचा वापर रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी करावा लागतो जैविक किड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क व निमार्कचा वापर करावा.

बीजामृत(बीजप्रक्रिया)

बियाणे बीजप्रक्रियासाठी बीजामृत वापरता येते बीजामृत तयार करण्यासाठी गाईचे शेण ५ किलो, गोमूत्र ५ लिटर, दूध १लिटर, चुना २५० ग्रॅम, हे मिश्रण रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरता करता येते.

जीवामृत

गाय अथवा बैलाचे शेण १० किलो, १० लिटर गोमूत्र, २ किलो गूळ, बेसनपीठ २ किलो, १ किलो वनातील माती हे मिश्रण प्लास्टीकच्या ड्रममध्ये २०० लि. पाण्यात ५-८ दिवस आंबवून दररोज ३ वेळा मिश्रण ढवळून घेणे आणि सदरचे मिश्रण १ एकर क्षेत्रासाठी पाण्यावाटे पिकास देता येते. Organic Farming

अमृतपाणी

गाईचे शेण १०-११  किलो, गाईचे तूप २५० ग्रॅम आणि गूळ/ मध ५०० ग्रॅम हे मिश्रण २०० लि. पाण्यात मिसळून तयार केलेले अमृतपाणी ३०-३२  दिवसांच्या अंतराने १ एकर क्षेत्रासाठी पाण्याद्वारे द्यावे. त्यानंतर १ महिन्याने झाडांच्या २ ओळींमध्ये पाण्यातून देता येते.

हे हि वाचा : सर्व गावातील ग्रामपंचायत योजनांची यादी आली आहे पहा

दशपर्णी

मर रोग, मूळकुजव्या, भुरी, केवडा, करपा, तेल्या या रोगांच्या नियंत्रणासाठी १० वनस्पतींचा (नीम, कन्हेर, निर्गुडी, घाणेरी, पपई, सिताफळ, गुळवेल, एरंड, करंज, रूई) २०-२६ किलो पाला,२ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा , २५० ग्रॅम लसूण, ३-५ किलो शेण, ३ लि. गोमूत्र हे मिश्रण २००-२२०  लि. पाण्यात मिसळून दररोज ३ वेळा मिश्रण ढवळून १ महिना आंबवून पिकावर फवारणीसाठी वापरतात. अशा प्रकारे २०० लि. अर्कामधून गाळलेला ५-६ लि. दशपर्णी अर्क+५ लि. गोमूत्र २०० लि. पाण्यात मिसळून रोग व किडिंच्या नियंत्रणासाठी वापरता येत असते .

Wheat Cultivation

पंचगव्य

शेण ५ किलो, नारळाचे पाणी/गोमूत्र ३-३.५०  लि., गाईचे दूध २ लि., तूप १ किलो हे मिश्रण ७-८ दिवस आंबवून दिवसातून २ वेळा हलवावे. तयार झालेले पंचगव्य १० लि. पाण्यात मिसळून जमिनीवर पाण्यावाटे फवारनि करावी. एकरासाठी २० लि. पंचगव्य वापरता येत असते.

सेंद्रिय हळद लागवड

सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीपासून अधिक आर्थिक फायदा मिळवण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी लागवडीच्या वेळी ११-१२ टन गांडूळखत प्रति हेक्टरी देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. लागवडीच्या वेळी गांडूळखताबरोबर स्फुरद विरघळणारे जीवाणू अझोस्पिरिलम आणि फुले ट्रायकोडर्मा प्लस प्रत्येकी ५-६ किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात मिसळून द्यावे. हळदीमधील कंद कुज रोगाच्या नियंत्रणासाठी हळदीचे कंद फुले ट्रायकोडर्मा प्लस मध्ये (५ ग्रॅम प्रति लिटर) ५-६ मिनिटे बुडवून लावावेत.

Rabi Jowar

सेंद्रिय सोयाबीन आणि कांदा लागवड

सोयाबीन (खरीप):

कांदा (रब्बी) या पिक पध्दतीमध्ये सेंद्रिय शेतीसाठी नत्र व स्फुरदयुक्त जीवाणू खताची बिजप्रक्रिया करुन सोयाबीन पिकास हेक्टरी ५०-६० किलो आणि कांदा पिकास १०० किलो नत्राची मात्रा प्रत्येकी १/३ नत्र अन्नद्रव्य आधारीत प्रमाणानुसार शेणखत, गांडुळखत आणि निंबोळी पेंड या सेंद्रिय खताव्दारे देण्याची शिफारस करण्यात आली गेली आहे.

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

2 thoughts on “Organic Farming: सेंद्रिय शेती 2022”

Leave a Comment