Panand Roads राज्यातील पाणंद रस्ते शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी गरजेचे आहेत. या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करणार असल्याचे ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले आहे.

राज्यातील पाणंद रस्ते हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शेतीमालाची ने-आण करणे तसेच शेतातून काढलेल्या मालाची बाजारपेठेसाठी वाहतूक करणे आवश्यक असते. पावसाळ्यात रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, गैरसोयीला सामोरं जावं लागतं. या मुळे पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, शेत/पाणंद रस्ते हे अवर्गीकृत स्वरुपाचे रस्ते आहेत. या रस्त्यांना सुधारून ग्रामीण मार्गाचा दर्जा द्यावयाचा झाल्यास प्रथम त्यांचा समावेश रस्ते विकास आराखड्यामध्ये करणे आवश्यक असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांचे ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यात येईल.
सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे
लवकरात लवकर अर्ज करावे
Pm Kusum Solar Pump Yojana: सोलर पंप ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे 2023