PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त 2023 - डिजिटल शेतकरी

PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त 2023

PM Kisan: पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांकडून बँक अकाउंट नंबर, आधार नंबर चुकीचे असल्याने काही जणांना पैसे मिळाले नाही तसेच पीएम किसान पोर्टलवर काही चुकीची माहिती (PM Kisan)  असेल, तर त्यात दुरुस्ती करता येत आहे. दुरुस्तीचे हे काम घरी बसून ऑनलाईन करता येत आहे. बँक अकाउंट, लिंग, आधार नंबर या चुका दुरुस्त करता येतात आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ही सुविधा निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे.
PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त
PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त

▪️ जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

  • सुरुवातीला पंतप्रधान शेतकरी(Kisan )सन्मान निधीच्या वेबसाईटवर pmkisan.gov.in जावे लागेल. होम पेजवर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा ऑप्शन दिसेल आणि फार्मर्स ऑप्शनखाली हेल्प डेस्क लिहिलेलं असेल. हेल्प डेस्कवर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन दिसेल.
  • या पेजवर आधार नंबर, अकाउंट नंबर किंवा मोबाईल नंबरची नोंद करा आणि त्यानंतर गेट डाटाच्या बटनवर क्लिक करा. एक विंडो खुलेलं. तिथं तुम्हाला तुमची माहिती दिसेल आणि येथे ग्रिव्हन्स टाईपचा एक बॉक्स दिसेल. या बॉक्सवर क्लिक करून जी चुक असेल, तरी दुरुस्त करता येते त्यावर क्लिक करावं.PM Kisan
  • समजा बँक अकाउंट चुकीचा असेल, तर बँक अकाउंट नंबर चुकीचा असल्याचा ऑप्शन निवडा आणि डिसक्रीप्शन बॉक्समध्ये हिंदी किंवा इंग्रजीत अकाउंट नंबरची माहिती दिलेली असेल. ही माहिती भरून त्यानंतर कॅप्सा भरावा लागेल त्यानंतर सबमीटच्या बटनवर क्लीक करावे.

काही दिवसानंतर खाता अपडेट होईल

तुम्ही पीएम किसान(Kisan )योजने अंतर्गत बँक अकाउंट नंबर बदलण्यासाठी पीएम किसानच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. काही दिवसानंतर बँक अकाउंटची माहिती दुरुस्त केली जाणार आहे.

आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment