Pm Kisan: केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे आणि या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील जवळपास ७३ लाख शेतकऱ्यांना १ जुलैला वितरीत होण्याची शक्यता असून केंद्राच्या योजनेचे दोन हजार तर राज्याच्या योजनेतून दोन हजार, असे चार हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार देखील आहेत. पण, राज्यातील १६ लाख तर सोलापूर जिल्ह्यातील एक लाख १६ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही कारण त्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरणासह इतर निकष पूर्ण केलेले नाहीत.(Pm Kisan)
राज्यातील ७३ लाख शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत आणि त्या सर्वांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळाला होता. पण, त्यानंतर आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, लाभार्थींच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित नोंद करण्याचे बंधन घालण्यात आले. त्यात अजूनही सुमारे १६ लाख शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली दिसत नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना तत्काळ या प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘हे’ टप्पे पूर्ण करा, मग मिळेल लाभ
▪️आधार प्रमाणीकरण
▪️ई-केवायसी
▪️मालमत्तांची एकत्रित ऑनलाइन नोंद
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा १४ वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरित होणार आहे अनि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याच्या योजनेचा मोठा लोकार्पण सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिले असून १ जुलैला हा कार्यक्रम होणार आहे..Pm Kisan
हे हि वाचा : डिजिटल स्वाक्षरी असलेले ७/१२ कसा काढायचा
Kel nukasan bharapai