PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा खूप प्रयत्न असतो.यातीलच एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) होय. देशातील शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना राबवण्यात येत असते. या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे जी जे शेतकरी या योजनेशी अद्याप जोडले गेले नाहीत, त्यांना या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना 6000 रुपयांचा वार्षिक लाभ मिळत असतो. मात्र, जे शेतकरी या योजनेशी काही कारणामुळं जोडले गेले नाहीत, ani त्या शेतकऱ्यांना देखील योजनेशी जोडण्याची संधी मिळणार असल्याचे चौहान म्हणाले आहे. पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेशी जोडण्यासाठी सरकारकडून मोहीम राबवली जात आहे तसेच यामध्ये तीन मोहिमा राबवण्यात आल्या असून चौथी मोहीम 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे.,
केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्य सरकारांना या योजनेंतर्गत पात्र असलेल्या अशा शेतकऱ्यांची ओळख करुन देण्यासाठी सरकारला मदत करण्यास सांगितले आहे. अशा शेतकऱ्यांना मागील थकबाकीची रक्कमही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असते. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल ॲप आणि पीएम किसान पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, अद्यापही ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे…
शेतकऱ्यांनी हे काम पूर्ण करावं
अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणीकृत आहेत, परंतु तरीही लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचत नाही तसेच याची अनेक कारणे असू शकतात. जसे की ई-केवायसी झाली नाही, लाभार्थी शेतकऱ्याच्या जमिनीची पडताळणी झालेली नाही किंवा अर्ज करताना शेतकऱ्याने काही चूक केली आहे.(PM Kisan Samman Nidhi Yojana) केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची रक्कम त्यांच्या खात्यात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्व आवश्यकता पूर्ण करण्यास सांगितले आहे आणि या योजनेंतर्गत आतापर्यंत 19 हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता शेतकरी 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.