कुक्कुटपालन आजार व उपचार कसे करावे आणि त्यातील टप्पे कसे असावे त्यामुळे होणारी हनी टाळता येईल आणि नफा तसेच कुक्कुटपालन चे आरोग्य चागले राहील. कुक्कुटपालन अंडी हि चागले देतील त्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे ते आज आपण या लेखातून पाहणार आहोत मित्रानो…..
वय- १ ते १० दिवस असल्यावर
आजार/उपचार – जीवनसत्त्व ““अ*” पाण्यातून औषध १ मिली/१०० पिल्ले ““अ** जीवनसत्त्व अधिक ७ ग्रॅम अँटीबॉयोटिक पावडर.
मुदत- १० दिवस
वय- तिसरा आठवडा
आजार/उपचार- हगवण औषध अर्धा ग्रॅम सल्फाडूग किंवा नायट्रोफ्युरॉन देणे एक लिटर पाण्यात.
मुदत -रोग थांबेपर्यंत
वय- ४ ते ५ आठवडे
आजार/उपचार लंगडेपणा असल्यास औषध २० मिली बी- कॉम्प्लेक्स १०० पक्षांना पाण्यातून देणे मुदत -७ दिवस.
आजार/उपचार फरक न आढळल्यास आणि औषध जीवनसत्त्व – अ, ब, अ-ड-३ १५७ मिली. पाण्यातून मुदत -४.ते ५ दिवस देणे.
वय- दुसऱ्या व सहाव्या आठवड्यात
आजार / उपचार– पिल्लांची वाढ बरोबर होत नसल्यास आणि औषध जीवनसत्व अ — ब, — ड, २५ ग्रॅम १०० किलो खाद्यामधून मुदत – सतत ५/६ दिवस द्यावे लागेल.
वय- ७/८ वा आठवडा
आजार/उपचार – पोटातील जंतासाठी जंतनाशक औषध पायपराझीन जंतनाशक देणे मुदत – एक वेळेला, त्यानंतर महिन्यातून एक वेळेस देणे.
वय- कोणत्याही वयात
आजार-ताण पडल्यास उपचार- लहान पक्ष्यांना जीवनसत्त्व-अ १ मिली आणि मोठे पक्षी २ ते ७ मिली. (१०० पक्ष्यांना) 9 दिवस देणे.
वय- २० ते २४ आठवडे
आजार- अंड्यावर आल्यावर सुरूवातीला येणाऱ्या ताणासाठी आणि उपचार- कॅल्शियम व जीवनसत्त्वे एकत्र असलेली औषधे पाण्यातून द्यावीत. मुदत – अंडी व्यवस्थित देण्याचे सुरू होईपर्यंत आणि खाद्य व पाणी व्यवस्थित घेईपर्यंत देणे..
वय- कोणत्याही वयात आणि आजार- रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि उपचार- नायट्रोफ्युरॉन औषधे दत- दर महिन्यात एक आठवडा देणे.
वरील प्रमाणे सर्वसाधारण औषधोपचाराची रूपरेषा आहे. परंतु औषधोपचार करतांना तज्ञांचे मार्गदर्शन अवश्य घ्यावे.
तसेच पक्षी मेल्यास शवविच्छेदन करून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावायच असतो.
उपचारापेक्ष्या प्रतिबंधात्मक उपचार-
- पक्षी खरेदी अधिकृत व नामांकीत अंडी उबवणी केन्द्राकडूनच करावयाची असती.
- पक्षांचे घरातील तापमान व वायुविजन हे योग्य राहील याकडे विशेष लक्ष द्यावे लागत असते.
- घरे स्वच्छ ठेवावीत वेळोवेळी निर्जतुक करून घ्यावीत आणि थोड्या जागेत प्रमाणपेक्षा जास्त पक्षी ठेवू नका . पक्षांना योग्य प्रमाणात जागा द्यावी लागते.
- पक्षांना पुरेसे व समतोल खाद्य द्यावे लागत असते.
- रोग प्रतिबंधक लसी योग्य वेळी टोचून द्यावे लागत असते.
- आवारामध्ये उडते पक्षी, कुत्री, मांजरे, उंदीर, घुशी येवू नयेत असा प्रतिबंध उपाय करावा.
- मेलेल्या पक्षांना खड्डयात खोल पुरून टाकावे अगर जाळून टाकावे.
- कळपातील आजारी पक्षी त्वरीत बाहेर काढून त्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन करून घावे.
- नवीन पक्षी जुन्या पक्षात लवकर मिसळू नये.
- शेडच्या बाहेर चुन्याची भुकटी अथवा फिनाईलचे पाणी भरून ठेवावे म्हणजे घरात प्रवेश करतांना त्यामध्ये पाय बुडवून प्रवेश करता येईल.
- औषधोपचार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्या.
- आजारी किंवा मेलेल्या पक्षांची शवविच्छेदन तज्ञांकडून करून घ्यावी आणि त्यामुळे रोग निदान करता येते व औषधोपचार करता येत असतात.
हे हि वाचा : कुक्कुट पालन व्यवसायातुन बेरोजगारांना मिळेल रोजगार
1 thought on “कुक्कुटपालन आजार व उपचार ( Poultry diseases and treatment ) 2022”