rain : या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याची परिस्थिती असताना, आता पुन्हा एकदा पुढील आठवड्यात मराठवाड्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला गेला आहे.
13, 14 मार्च रोजी पावसाची rain शक्यता
मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13 मार्ज रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात तर दिनांक 14 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हा प्रभाव दिसून येईल. मराठवाड्यात साधारण १६ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहनार आहे.
शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान!
या आठवड्यात 5 ते 7 मार्चदरम्यान मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि विशेष म्हणजे काढणीला आलेला गव्हाचं पीक अक्षरशः आडवं झालम आहे. सोबतच उन्हाळी पिकासह फळ भागांना देखील या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे आधी अतिवृष्टी आणि आता अवकाळी पावसामुळे यावर्षी दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. अशात आता सरकराने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी करत देखील आहे. rain
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातर्फे शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाची सूचना देण्यात आली आहे आणि 13 आमि 14 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याने काढणीस तयार असलेल्या द्राक्ष वा इतर फळांची काढणी करून घ्यावी. तसेच फळधारणा सुरु असलेल्या आंबे बहार, संत्रा, मोसंबी बागेस गरजेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. वादळामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याचीही काढणी करून घ्यावी आणि टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी सुरक्षित ठिकाणी करावी.या दिवशी जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. rain
हे हि वाचा : खत खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी