Rain Forecast : विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 2023 - डिजिटल शेतकरी

Rain Forecast : विदर्भात वादळी पावसाचा अंदाज 2023

Weather Update Pune : Rain Forecast  दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असतानाच, राज्याच्या उर्वरित भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहणार  आहे. आज (ता. १३) विदर्भातील अमरावती, चंद्रपूर वर्धा येथे उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे तसेच विदर्भात वादळी पावसाचा इशारा असून, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा मेघगर्जनेसह, पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. देशाच्या अंतर्गत भागात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे असल्यास, कमाल तापमानात ४.५ अंशांपेक्षा वाढ झाल्यास, तसेच किनारपट्टीवर तापमान ३७ अंशापेक्षा अधिक असल्यास व त्या ठिकाणी उष्णतेची लाट समजली जात असते.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती, तेसच कोकणातील सांताक्रूज आणि डहाणू येथे उष्णलाट होती आणि सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.(Rain Forecast )

तळ कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला असला तरी राज्यात पूर्वमोसमी पाऊस सुरू राहणार आहे. तसेचआज (ता. १३) विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली गेली आहे.

मॉन्सूनची वाटचाल सुरूच

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल सुरूच असून, सोमवारी (ता. १२) संपूर्ण तामिळनाडूसह कर्नाटकचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भागासह कोकणच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे आणि  तर संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली आहे.

सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) खालील प्रमाणे :

पुणे ३५.९ (२४.९), जळगाव ४१.६ (२७.५), धुळे ४१.० (-), कोल्हापूर ३२.१ (२४.१), महाबळेश्वर २४.२ (१८.१), नाशिक ३७.३ (२४.२),

निफाड ३८.६ (२४.४), सांगली ३३.५ (२४.१), सातारा ३४.५ (२४.४), सोलापूर ३८.२ (२४.४), सांताक्रूझ ३८.३ (२४.५), डहाणू ३८.४ (२४.१), रत्नागिरी ३४.० (२५.०),

छत्रपती संभाजीनगर ३६.४ (२४.२), नांदेड – (२६.८), परभणी ३९.३ (२६.४), अकोला ४१.५ (३०.४), अमरावती ४१.८(२७.०), बुलढाणा ३८.४ (२७.०), ब्रह्मपूरी ४३.० (२७.८),

चंद्रपूर ४२.४(२९.०), गडचिरोली ४१.४ (२७.२), गोंदिया ४२.८ (२५.२), नागपूर ४२.६ (२६.४), वर्धा ४३.५(२९.८), वाशीम ३९.८(२६.२) यवतमाळ ४२.० (२६.२).

विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.Rain Forecast

हे हि वाचा : शेतकऱ्यांसाठी योजना मागेल त्याला शेततळे

 

सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment