Rain Forecast Maharashtra : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने उन्हाचा चटका कमी होत आहे तसेच आज (ता. ५) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला गेला आहे. उर्वरित राज्यात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज राहील.
पावसाला पोषक हवामान, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत काल रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर अमरावती, ब्रह्मपूरी, अकोला आणि वर्धा येथे तापमान ४३ अंशांच्या पुढे होते तसेच उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३५ ते ४३ अंशांच्या दरम्यान होते.(Rain Forecast Maharashtra)
अरबी समुद्राच्या आग्नेय भागात आज (ता. ५) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे आणि या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. दरम्यान पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.(Rain Forecast Maharashtra)
दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत आणि या प्रणाली पासून तामिळनाडूपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, आज (ता. ५) राज्यात उष्ण व दमट हवामान हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.