Police : 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती - डिजिटल शेतकरी

Police : 20 हजार पोलिसांची भरती, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सायबर सेक्युरिटी, तुरुंगातील कैद्यांची(police) अवस्था यावर भाष्य केले होते. तसेच, वेदांता प्रकल्पावरुन विरोधकांनाही टोला लगावला आणि  यासोबतच, पोलीस(Police) विभागातील भरतीबाबत मोठी माहिती दिली आहे. राज्यात 20 हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे फडणवीस म्हणाले आहे.

police

20 हजार पोलिसांची (Police)भरती

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘येत्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला गेला आहे. लवकरच राज्यात 20 हजार रिक्त पोलिसांची भरती(Police) होईल आणि  8 हजारांची एक जाहिरात आधीच निघाली आहे, आता 12 हजारांची जाहिरात लवकर काढणार आहे. या भरतीमुळे पोलिस विभागावरील मोठा ताण कमी होईल,’ असे फडणवीस यावेळी  म्हणाले.

कैद्यांसाठी खास सुविधा

यावेळी त्यांनी तुरुंगातील कैद्यांबाबतही महत्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘राज्यातील तुरुंग विभागात सुधारणा करण्याची गरज आहे आणि  सध्या तुरुंगात 1641 असे कैदी आहेत, ज्यांची बेल झाली आहे, पण बेलबाँड करण्यासाठी त्यांच्याकडे (Police)व्यक्ती किंवा पैसे नसल्यामुळे ते तुरुंगातच आहे. अशा कैद्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही काही एनजीओची मदत घेणार आहोत,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सायबर सेक्युरिटीबाबत निर्णय

तसेच, ‘राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशींगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जात आहे. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करत असून,(Police) लवकरच राज्यात सायबर सेक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत.  आणि तसेच, जागरुकतेसाठी एक कँपेनदेखील हाती घेत आहोत,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हे हि वाचा : शेतकरी योजनांचा निम्मा पैसा जातो विमा कंपन्यांच्या खिशात पहा कसा खर्च होतो शेतकर्यासाठी निधी

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment