Sand Transportation Registration नमस्कार मित्रांनो, राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी नवीन रेती धोरण (New Sand Policy) जाहीर केले होते आणि या धोरणाअंतर्गत राज्यातील नागरिकांना वाळू प्रति ब्रास ६०० रुपयांनी मिळणार आहे. राज्यात अवैध्य वाळू उपशाला लगाम लागावा व सामान्य नागरिकांना कमी किंमतीत वाळू मिळावी यासाठी सरकारने हे धोरण अवलंबिवले गेले आहे. या नवीन धोरणामुळे इथून पुढे वाळू विक्रीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे Sand Transportation Registration . तर तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे वाळू वाहतूक वाहन नोंदणी करू शकता आणि याबद्दलच संपूर्ण माहिती घेणार आहोत.
Maharashtra Sand Policy: माफिराज, तस्करी, भ्रष्टाचार, त्यातून होणारे खून अशा वादात अडकलेल्या वाळूसंबंधी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे तसेच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. याची घोषणा आज विधानसभेत केली जाणार असल्याचे सुतोवाच स्वत: विखे यांनीच काल नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केले आहे. ऑनलाइन नोंदणी आणि मागेल त्याला सरकारतर्फेच घरपोच वाळू पुरवठा करण्याचा या धोरणात समावेश असल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले. Sand Transportation Registration
वाळू वाहन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
Online registration : ऑनलाइन नोंदणी आवश्यक
सर्व नागरिकांना वाळू खरेदी करण्यासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी लागणार आहे. तसेच राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली वाळू नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या वाहनांची सुद्धा ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने नोंदणी झालेल्याच वाहनांमधून वाळूची वाहतूक केली जाणार आहे आणि त्यामुळे ऑनलाइन नोंदणी अतिशय आवश्यक आहे. Sand Transportation Registration
राज्यातील सर्व इच्छुक वाळू वाहतूक धारकांना वाळू वाहतुकीसाठी महा-खनिज वेबसाईटवर आपल्या वाहनाची नोंदणी करावी लागणार आहे तसेच वाहनांची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या वाहनाला GPS असेल तरच वाहन वाळू वाहतुकीसाठी पात्र असणार आहे.
अशी करा ऑनलाइन वाळू वाहतूक वाहन नोंदणी
1) सर्वांत अगोदर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर 👉महाखनिज👈
या वर जाव लागणार आहे.
2) वेबसाईटवर आल्या नंतर तुमच्या नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये Sand Booking या ऑप्शन मध्ये Transport या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
3) ट्रान्सपोर्ट वर क्लिक केल्यानंतरअसे पेज ओपन होईल या मध्ये SIGN UP वर क्लिक करून नवीन Account बनवून घेणात यावे.
4) Sign Up च्या पेज मध्ये यामध्ये तुमचे नाव व मोबाईल नंबर टाकून तुमचा जिल्हा निवडून Submit वर क्लिक करावे.
5) त्या नंतर Next पेज वर पासवर्ड तयार करून Login करावे.
6)लॉगीन झाल्यानंतर Vehicle list या वर क्लिक करावे.
8) या मध्ये उजव्या कोपऱ्यात तुमच्या वाहनाचा नंबर टाकन Search केल्यानंतर तुमच्या वाहनांची संपूर्ण माहिती दिसेल जर वाहनांची माहिती दिसत नसेल तर आपण मॅन्युअल्ली माहिती भरून भरा आणि ज्या मध्ये तुमच्या वाहनाची नंबर प्लेट व दोन्ही बाजूचे फोटो असे तीन फोटो अपलोड करून Submit करा.
तर अशाप्रकारे तुम्ही वाळू वाहतूक करण्यासाठी वाहनाची नोंदणी करू शकता, तर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या वाहनावर जीपीएस लोकेशन बसवले जाईल आणि तुम्ही मग वाळूचे वाहतूक करू शकत आहात.