Breaking News: Sharad Pawar राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर त्यांची जागा कोण घेणासर यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता परंतू, आज त्यांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.
24 वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली तसेच भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केली. यानंतर त्यांनी भाषण थांबविले. परंतू, पुन्हा बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीतील जबाबदाऱ्यांची घोषणा करून टाकली गेली आहे.Sharad Pawar
प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली आणि याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा अदी राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंना देखील पवारांनी कार्यकारी अध्यक्ष केले गेले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे.
सुनिल तटकरे – राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी, जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
हे हि वाचा : युक्रेनमध्ये उद्ध्वस्त धरणातील पाण्यात बुडाली हजारो घरे..
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा
जबरदस्त निर्णय वयोमानामुळे ,शरद चंद्र पवार यांचा निर्णय घेण्यामागे समझ दारी व निष्वाणात राजनितीतज्ञ व्यक्ती महत्वाचि रणनिती असावी. हा एक भविष्यात इतर पक्षासाठी माष्टरस्ट्रोक असेल.