Shram Vidya Educational Loan Scheme: मोठी घोषणा! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार 'या' कर्ज योजनेचा लाभ - डिजिटल शेतकरी

Shram Vidya Educational Loan Scheme: मोठी घोषणा! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार ‘या’ कर्ज योजनेचा लाभ

Shram Vidya Educational Loan Scheme: राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबामधील इयत्ता बारावीपर्यंत शिकलेल्या मुला-मुलींच्या पदवी शिक्षणासाठी शुन्य ते 4 टक्के व्याजदराने 15 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना’ सुरु केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून या कर्जाची परतफेड करण्यासाठी 10 वर्षे कालावधी म्हणजे नोकरी लागल्यानंतर परतफेड असणार आहे. 5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची व जामीनदारांची आवश्यकता नाही. 5 लाख ते 10 लाखापर्यंतच्या कर्जासाठी तारणाची आवश्यकता नसेल, मात्र एका जामीनदाराची आवश्यकता असेल.Shram Vidya Educational Loan Scheme

तसेच 10 लाख ते 15 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी तारण द्यावे लागेल तसेच दोन जामीनदारांची आवश्यकता असेल. 5 लाखांपर्यंत शुन्य टक्के, 5 लाखांच्या वर ते 10 लाखांपर्यंत 2 टक्के तर 10 लाखांच्यावर ते 15 लाखापर्यंत 4 टक्के व्याजदर असणारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माहीती दिली आहे.

देशातील सर्व राज्य सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य सहकारी बॅंकेचा सर्वात जास्त 6 हजार 545 कोटींचा स्वनिधी, सर्वात जास्त 45 हजार 64 कोटी रुपयांचा व्यवहार, सर्वात जास्त 3 हजार 879 कोटींचे नक्त मुल्य, सर्वात जास्त 609 कोटी रुपयांचा निव्वळ नफा हे या बँकेचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

हे हि वाचा : आपला सिबिल/क्रेडीट स्कोर पहा आपल्या मोबाईलवर फक्त दोन मिनिटात

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment