sleep and health: आपली झोप पूर्णच होत नाही काय आहेत 7 लक्षणं ते पहा - डिजिटल शेतकरी

sleep and health: आपली झोप पूर्णच होत नाही काय आहेत 7 लक्षणं ते पहा

sleep and health: झोप आणि आरोग्य  (sleep and health) यांचा जवळचा चागला  संबंध असतो.  सुंदर त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असतेच . पण सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकजणांना झोपेशी निगडित समस्यांना (sleep deprivation)  सामोरं जावं लागत आहे आणि  कोणाला लवकर झोपच येत नाही. तर कोणाला  रात्री मध्येच जाग येवून नंतर झोप लागत नाही. तर कोणाला मध्ये मध्ये सारखी जात येते, कोणाला अस्वस्थ झोप लागत असते. झोपेशी निगडित या समस्या उद्भवल्या की त्याचे परिणाम आरोग्यावर होतातच असतात.

झोप पूर्ण झाली नाही किंवा शांत झोप लागली नाही की दिवसभर थकल्यासारखं वाटतं असते आणि कमी झोपेचा परिणाम  (sleep deprivation effects on health) केवळ शरीराच्या ऊर्जेवरच होतो असं नाही तर इतरही आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत असते.  कधी कधी झोपेची समस्या काही जणांमध्ये इतकी जुनी आणि सवयीची होते की आपला झोपेचा पॅटर्न हा आहे असा समज काहीजण करुन घेत असतात.

पण शरीराला आवश्यक तेवढी झोप मिळाली नाही तर त्याचे परिणाम इतर गोष्टींवर होत असतात. काही गोष्टींवरुन आपल्याला झोप पुरेशी मिळत नाही हे सहज ओळखा येत असते. ही लक्षणं ओळखून (sleep deprivation symptoms)  झोपेच्या समस्येचा गांभिर्यानं विचार करायला हवा आणि शांत झोप लागण्यात अडचणी येत असतील तर त्यासाठी डाॅक्टरांचा सल्ला घेणं, आवश्यक औषधोपचार घेणं जास्त  आवश्यक आहे.

झोप कमी मिळतेय हे कसं ओळखावं?

  1. झोप पुरेशी मिळाल्यास सकाळी आपोआप लवकर जाग येत असते. पण झोप पूर्ण होत नसेल तर जाग येण्यासाठी अलार्म लावावा लागत असतो आणि एकदा नाही तर काही दोन तीन अलार्म लावून झोपत असतात. ही सवय नसून झोप कमी मिळत असल्याचं लक्षण आहेत.
  2. गाडी चालवताना डोळे जड होणं, जांभया येणं हे कमी झोपेचं लक्षण असते आणि गाडी चालवताना खूप झोप येत असल्यास कमी झोपेमुळे शरीर आणि मनाला थकवा आला आहे हे ओळखावं लागत असते.
  3. झोप पुरेशी झाली नसल्यास काम करताना दिवसभर आळस येत असतो आणि जांभया येतात. त्यामुळे कामात लक्ष लागतच नाही. लक्ष एकाग्र करण्यासाठी सतत चहा /काॅफी पिण्याची गरज भासत असते आणि सतत चहा/ काॅफी प्यावीशी वाटणं हे कमी झोप होत असल्याचं लक्षण आहे.
  4. कमी झोप झालेली असल्यास साहजिकच शरीर आणि मनाला थकवा येत असतो आणि त्यामुळे कामात लक्ष लागत नाही. कामात लक्ष न लागल्यानं कामात चुका होत असतात आणि वारंवार कामात चुका होत असल्यास झोपेच्या बाबतीत काहीतरी बिनसलंय हे लक्षात घेतले पाहिजे.
  5. झोपेचा आणि रोगप्रतिकारशक्तीचा जवळचा संबंध आहे आणि दीर्घ काळापासून कमी झोप मिळत असल्यास किंवा झोपेशी निगडित समस्या जाणवत असल्यास त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती कमजोर होत असते आणि  सारखं आजारपण मागे लागतं.
  6. अपुऱ्या झोपेचा परिणाम अल्पकालीन स्मृतीवर होत असतो आणि यामुळे गोष्टी, कामं लक्षात राहात नाही. विसरभोळेपणा वाढत असतो. सारखं विसरल्यासारखं होतं आणि वाढत जाणारा विसरभोळेपणा हा कमी झोपेचा परिणाम आहे.sleep and health
  7. शांत आणि पुरेशी झोप झालेली नसल्यास त्याचा परिणाम म्हणजे सतत थकवा येत असतो. थकव्याचा परिणाम मूडवर होत आणि पुरेशी झोप घेत नसल्यास उदास होणं, निराश वाटणं, सतत चिंता वाटणं हे परिणाम दिसतात. कमी झोप घेणाऱ्या व्यक्तिंचा स्वभाव चिडचिडा होत असतो. त्यांना सारखा राग येतो, चिडचिड होते आणि यापैकी एक किंवा अनेक लक्षणं जाणवत असल्यास वेळीच सजग होवून झोपेकडे लक्ष द्यायला हवं.

हे हि वाचा : वजन कमी करण्यासाठी सतत लिंबू पाणी पिण्याची सवयही तोट्याचीच, दिवसभरात किती लिंबू पाणी प्यावं?

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

3 thoughts on “sleep and health: आपली झोप पूर्णच होत नाही काय आहेत 7 लक्षणं ते पहा”

  1. माझी सुद्धा झोप कमी होत असते ह्या करिता काय उपाय करावे लाभेल कळवा विनंती

    Reply

Leave a Comment