Snoring: आजकाल घोरणे ही एक अतिशय सामान्य समस्या झाली आहे आणि बहुतांश लोक झोपेत जोरजोरात घोरतात. झोपेत घोरल्यामुळे शेजारी असलेल्या व्यक्तीची झोप खराब होते तसेच अनेक लोक या घोरण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, झोपताना घोरणे ही देखील एक गंभीर समस्या असू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन यावर उपचार करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल करू शकतात आणि घोरण्याच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.
🥐 हळद
Snoring हळद ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि आयुर्वेदामध्ये हळदीचा उपयोग अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर घोरण्याच्या समस्येवर हळद एक रामबाण उपाय ठरू शकते आणि हळदीमध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे बंद नाक उघडण्यास मदत करतात. हळदीचे सेवन केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते, परिणामी घोरण्याची समस्या दूर होते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन करू शकतात तसेच नियमित हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने घोरण्याची समस्या दूर होते आणि आरोग्यही निरोगी राहते.
🍯 मध
मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि मधामध्ये अँटिइम्प्लिमेंटरी आणि अँटिमाइक्रोबियल गुणधर्म आढळून येतात. मधाचे सेवन केल्याने सर्दी आणि घसा दुखीपासून आराम मिळतो तसेच मधामध्ये आढळणारे गुणधर्म घशातील संसर्ग दूर करण्यास मदत करतात. मधाच्या सेवनाने नाकाचा मार्ग मोकळा होतो आणि श्वसनक्रियेतील व्यत्यय दूर होतो. घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्री कोमट पाणी किंवा दुधामध्ये एक चमचा मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात.
🍤 आले
घोरण्याची समस्या दूर करण्यासाठी आले फायदेशीर ठरू शकते कारण आल्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. आल्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम यासारखे पोषक घटक आढळून येतात. हे घटक थकवा दूर करण्यास मदत करतात आणि या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आल्याच्या चहाचे सेवन करू शकतात.
🧅 कांदा
घोरण्याच्या समस्येवर कांदा एक रामबाण उपाय ठरू शकतो कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. कांद्याचे सेवन केल्याने नाक आणि घसा निरोगी राहतो तसेच घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही रात्रीच्या जेवणात शिजवलेला कांदा खाऊ शकतात. कांदा खाल्ल्याने शांत झोप लागते.Snoring
हे हि वाचा : तुम्हाला बायोकॅप्सूल खते माहिती आहेत का