Solar energy: महावितरणकडून छतावरील साैर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांना वेग आला आहे तसेच राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट महावितरणने चार महिन्याआधीच पूर्ण केले गेले आहे. या यशाबद्दल महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. उद्दिष्ट पूर्ण झाले असले, तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.(Solar energy
४० टक्क्यांपर्यंत अनुदान
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सौर ऊर्जानिर्मितीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते तसेच गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली, तर त्यांना ती महावितरणला विकता येते. छतावरील सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून वीज ग्राहकांना ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.Solar energy