Sugarcane bag: उसाचे पाचट कुजण्यासाठी हे करा उपाय 2023 - डिजिटल शेतकरी

Sugarcane bag: उसाचे पाचट कुजण्यासाठी हे करा उपाय 2023

1) Sugarcane bag उसाच्या पाचटात 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फुरद आणि 0.7 ते 1 टक्के पालाश आणि 32 ते 40 टक्के सेंद्रिय कर्ब असते आणि ऊसतोडणीच्या वेळी पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला करून उसाचे बुडखे मोकळे करावेत तसेच उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढत असते.

2) बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेच 10 ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होत असतोSugarcane bag.

3) शेतात पसरलेल्या पाचटावर प्रतिहेक्‍टरी 80 किलो युरिया, 100-११० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू वापरावेत. त्यानंतर उसास पाणी द्यावे आणि जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने थोडे दाबून द्यावे किंवा शेतात जनावरे मोकळी सोडावीत. जनावरांच्या पायाने पाचट दबण्यास मदत होत असते. पाचटाचा मातीशी संबंध येऊन ते हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होत असते.

4) खोडव्याला पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली खतमात्रा द्यावी लागते. माती परीक्षणाच्या शिफारशीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वाफसा असताना दोन समान हप्त्यांत द्यावी आणि पहिली खतमात्रा 15 दिवसांच्या आतच पूर्ण करण्यात यावी. पहारीने बुडख्यांपासून 10 ते 15 सें.मी. अंतरावर 15 ते 20 सें.मी. खोल छिद्र घेऊन सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी तसेच दोन छिद्रांमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दुसरी मात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने 135 दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी दिले जावे.Sugarcane bag

5) रासायनिक खतांना पूरक म्हणून जैविक खतांचा वापर केल्यास रासायनिक खतात बचत होत असते. ऍझोटोबॅक्‍टर, ऍझोस्पिरीलम, ऍसिटोबॅक्‍टर आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक प्रत्येकी 1.25 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात एकूण पाच किलो जिवाणू खतांचा वापर करण्यात यावा. त्यासाठी ही जिवाणू खते 25 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये एकत्र करून उसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत किंवा पाण्यामध्ये किंवा शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र करून वापरावीत. जिवाणू खतांचा वापर केला असता 25 टक्के नत्र आणि स्फुरद खताची बचत होत असते; Sugarcane bag म्हणून शिफारशीत नत्र आणि स्फुरदाची खतमात्रा 25-२७  टक्‍क्‍यांनी कमी करावी.

हे हि वाचा : उन्हाळ्यात ‘या’ गवताची लागवड करून मिळवा 5 वर्ष पीक, दूध उत्पादनात 10 ते 15 टक्क्यांनी वाढते.

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

Leave a Comment