Tractor Subsidy Maharashtra : अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर कर्ज योजना पुन्हा होणार सुरू; कर्ज मर्यादेत केली वाढ 2023 - डिजिटल शेतकरी

Tractor Subsidy Maharashtra : अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर कर्ज योजना पुन्हा होणार सुरू; कर्ज मर्यादेत केली वाढ 2023

Tractor Subsidy Maharashtra Government : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून ट्रॅक्टर कर्जाचा व्याज परतावा देण्यात येणार असून योजना राज्यात पुन्हा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली गेली आहे.Tractor Subsidy Maharashtra

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळाच्याअ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा अंतर्गत ट्रॅक्टरवरील कर्ज व्याज परतावा बंद करण्यात आला होता आणि तो पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, “तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर कर्जाचा परतावा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

महामंडळाची ७७ वी संचालक मंडळाची बैठक २६ एप्रिल झाली आणि बंद केलेला कर्ज व्याज परतावा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच”पुढे पाटील म्हणाले, “महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र तयार करण्यापूर्वी अनेक लाभार्थीनया बँकेमार्फत कर्ज मंजूर करण्यात आले होते. ते नंतर नामंजूर करण्यात आले होते.

त्या अंतर्गत ५५६ लाभार्थीना महामंडळाच्याअ योजनेमध्ये सामावून घेऊन १७ कोटींपर्यंतचा व्याज परतावा देण्या येणार आहे आणि तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढून १५ लाख केली आहे. तर कर्जाचा कालावधी ७ वर्ष करण्यात आला आहे.”

बँकेसोबत करार

बँक ऑफ इंडियासोबत महामंडळाने पाच जिल्ह्यात करार केला असून उर्वरित जिल्ह्यातही करार करण्यात येणार आहेत नी  लहान व्यवसाय करणाऱ्या लाभार्थीना लघु कर्ज योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

बँकेकडून कर्जास टाळाटाळ (Tractor Subsidy Maharashtra )

लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत तसेच  त्याची चौकशी करण्यात येईल. त्यानंतर अशा बँकांवर कारवाई करण्यासाठी सहकार आयुक्तांना कळवले जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

अर्थसंकल्पीय निधी

महामंडळासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झालेल्या ३०० कोटी रुपयांच्या निधीपैकी १५० कोटी रुपये महामंडळला देण्याचा निर्णय घेण्यात आला गेला आहे.

हे हि वाचा : पाईप लाईन अनुदान योजना 2023

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment