Video - संतापजनक! फक्त 1000 रुपयांसाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिले - डिजिटल शेतकरी

Video – संतापजनक! फक्त 1000 रुपयांसाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिले

उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर येत आहे.एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे ते यासाठी कि  फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. महिला वेदनेने कळवळत होती पण तरीही कोणतंही वाहन तिच्या मदतीसाठी थांबलं नाहीय या घटनेचा एक व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये पंधरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे आणि  एका गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यासाठी रुग्णवाहिका देखील बोलावण्यात आली होती. पण जेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाला महिलेच्या नातेवाईकांमकडे पैसे नसल्याचं कळलं तेव्हा त्याने रस्त्यातच गर्भवती आणि तिच्या काही नातेवाईकांना रुग्णवाहिकेतून खाली उतरून दिले आहे. एका हजार रुपयांसाठी ही घटना घडली आहे.

येथे पहा व्हिडीओ(Video) क्लिक करा 

राजेश साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे त्यांनी या पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. रुग्णवाहिका चालकाने महिलेच्या कुटुंबाकडे 1000 रुपये मागितले होते पुढे  तरच रुग्णालयात पोहोचवू असं सांगितलं. पण कुटुंबाकडे तितके पैसे नव्हते, त्यामुळे ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाही म्हणून त्याने महिलेला रस्त्यात सोडलं आणि तो तिथून निघून गेला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत(Video) रस्त्याच्या कडेला एक गर्भवती बसलेली असल्याचं दिसतं आहे. तिला प्रसूती वेदना होत आहेत आणि  तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. तर पुढे एक रुग्णवाहिका तिथून जाताना पाहायला मिळत  आहे.  हा व्हिडीओ(Video) पाहून सर्वांना धक्का बसला आहे आणि  रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त देण्यात आले  आहे.

हे हि वाचा : हाता-पायांमध्ये येणाऱ्या झिणझिण्यांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या कशामुळे होते ही समस्या!

 

जॉईन करा डिजिटल शेतकरी मॅगझीन आणि मिळवा शेती विषयक माहिती ,न्यूज़ , जॉब अपडेट्स , बाजार भाव, त्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा तसेच आलेला नंबर सेव्ह करा.

Leave a Comment