Weather Update : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा 2023 - डिजिटल शेतकरी

Weather Update : विदर्भात उष्ण लाटेचा इशारा 2023

Weather Update , Monsoon Update : पुणे : मॉन्सूनचे आगमन (Monsoon) लांबले असतानाच पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली गेली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने संपूर्ण विदर्भासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) आली आहे तसेच आज (ता. १७) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा आहे.(Weather Update)

उर्वरित राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील ब्रह्मपूरी आणि चंद्रपूर येथे उच्चांकी ४२.२ अंश सेल्सिअस, तर नागपूर आणि वर्धा येथे ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४२  अंशाच्या दरम्यान आहे. राज्यात जोरदार वारे वाहत असून, अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने कमाल तापमानात चढ-उतार होत आहे.

कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात सर्वच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, कोल्हापूर, सोलापूर येथे उष्णतेची भयाण लाट आली आहे.

विदर्भातील उष्णतेची लाट आज (ता. १७) कायम राहण्याची शक्यता आहे तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविली  आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली गेली आहे.

चक्रीवादळ निवळले

अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळ गुरूवारी (ता. १५) मध्यरात्री गुजरातच्या किनाऱ्याला धडकले होते. या वादळी प्रणालीचे केंद्र सौराष्ट्र आणि कच्छ दरम्यान भूजपासून ३० किलोमीटर पश्चिमेकडे होते.

गुजरातमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार केल्याने जनजीवन विस्कळीत आहे आणि चक्रीवादळ जमीनीवर आल्यानंतर निवळू लागले आहे. ईशान्येकडे सरकणारी ही प्रणाली आज (ता. १७) निवळून जाणार आहे.(Weather Update)

मॉन्सूनची वाटचाल जैसे थे

तळ कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्य काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनने सोमवारी (ता. १२) दक्षिण भारताच्या काही भागासह, संपूर्ण पूर्वोत्तर राज्ये आणि सिक्कीमसह, पश्चिम बंगाल, बिहारच्या काही भागात मॉन्सूनने प्रगती केली होती.

त्यानंतर मॉन्सूनची वाटचाल जैसे थे आहे आणि वादळ निवळल्यानंतर १८ ते २१ जून दरम्यान दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व भारताच्या आणखी काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) खालील प्रमाणे(Weather Update) :

पुणे ३४.२ (२५.३), जळगाव ४१.२ (२६.७), धुळे ३९.० (-), कोल्हापूर ३३.७ (२४.०), महाबळेश्वर २२.६ (१८.४), नाशिक ३३.८ (२५.२), निफाड ३५.० (२५.५), सांगली ३४.६ (२३.६), सातारा ३२.५ (२४.८), सोलापूर ३८.६ (२३.८), सांताक्रूझ ३५.६ (२९.०), डहाणू ३४.८ (२९.५), रत्नागिरी ३२.९ (२६.४), छत्रपती संभाजीनगर ३६.८ (२३.२), नांदेड ३८.४ (२६.४), परभणी ३९.१ (२६.२), अकोला ४१.३ (२८.५), अमरावती ४१.४(२६.९), बुलढाणा ३८.५ (२५.०), ब्रह्मपूरी ४२.२ (२८.६), चंद्रपूर ४२.२(२९.६), गडचिरोली ४१.४ (२८.४), गोंदिया ४१.७ (२७.२), नागपूर ४२.० (२८.८), वर्धा ४२.०(३०.४), वाशीम ४०.६(२४.८) यवतमाळ ४०.० (२५.५).

उष्ण लाटेचा इशारा :

अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

वादळी पावसाचा इशारा :

धाराशिव, लातूर, नांदेड.

उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :

ब्रह्मपूरी ४२.२, चंद्रपूर ४२.२, नागपूर ४२, वर्धा ४२.

हे हि वाचा : ‘हे’ कर्ज घेतलं की व्याज राज्य शासन भरणार? 

 

सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment