पुणेः आजचा हवामान राज्यात पाऊस कमी झाल्यानं ऊन खूप तापत आहे. हवामान अंदाज बुधवारी राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी झाल्या आहेत . हवामान विभागाने (IMD) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यातील अनेक भागांत बुधवारी पावसानं हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. सातारा (Satara) जिल्ह्यातही धरणक्षेत्रात हलक्या सरी झाल्या आणि सांगली जिल्ह्यात मात्र पावसाने उघडीप दिली आहे.
मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे आणि तर काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होत आहे. जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला आहे. तर छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या आहे. विदर्भातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
पूर्व विदर्भात अनेक भागांत मध्यम पाऊस झाला आहे. गडचिरोली, गोंदीया आणि वर्धा जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातही काही भांगांत जोरदार सरी झाल्या आहे. खानदेशातही तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक (Nashik) जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस पडल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. नगर जिल्ह्यात धरणक्षेत्रात काही वेळ हलका पाऊस झाला आहे. मात्र सर्वत्र पावसाचा जोर फार कमी होता.
विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज आणि आज उद्या विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्विली आहे. हवामान विभागानं आज उद्या सकाळपर्यंत विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. नागपूर, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे.
तर मराठवाड्यातील , जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदजा हवामान विभागाने जाहीर गेला केला.
हे हि वाचा : रस्ता मागणी अर्ज आणि रस्ता अडविणे 2022 तुम्हाला शेतात जायला रस्ता हवा आहे तर असा करा अर्ज