🔯 आजचे राशिभविष्य : तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..(HOROSCOPE)
मेष (Aries): आजचे राशिभविष्य जुन्या विचारात अडकून राहू नका आणि वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल आणि न्यायी वृत्तीने वागाल. कर्मठ विचार दर्शवू नका. प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि प्रयत्नांसाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे. अनुभवींचा सल्ला घेऊन नियोजन करणे हिताचे.
वृषभ (Taurus): आजचे राशिभविष्य खोलवर विचार करावा लागू शकतो आणि काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल आणि पराक्रमाला चांगला वाव मिळेल. स्वकर्तुत्वावर अधिक भर द्याल आणि अतिरेक घातक असतो हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हवा पण अतिआत्मविश्वास नको आणि विचारपूर्वक वागणे हिताचे.
मिथुन (Gemini) : आजचे राशिभविष्य व्यवहारी दृष्टीकोन ठेवून वागाल आणि राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका आणि चिकाटीने कामे कराल. चटकन निराश होणे टाळावे आणि आनंदात दिवस जाईल. मनाजोगत्या घटना घडतील आणि प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहारज्ञानाने वागणे हिताचे.
कर्क (Cancer) : गृहसौख्याला प्राधान्य द्यावे आणि मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील आणि व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे आणि थांबणे आणि विसंबून राहणे टाळा. आत्मनिर्भर व्हा आणि प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे हिताचे.
सिंह (Leo) : थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील आणि मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल आणि व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नका आणि डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा. प्रसंगाला धीराने सामोरे जा आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक राहणे हिताचे.
कन्या (Virgo) : कामात एकसूत्रता ठेवावी आणि घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल आणि गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. अधिक चिकाटीने कामे करावीत. तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल आणि व्यवहारज्ञानाचा उपयोग होईल. तब्येत जपा आणि घरच्यांना वेळ द्याल.
तुळ (Libra) : मनातील निराशा झटकून टाकावी आणि उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात आणि आपली वैचारिकता बदलून पहावी. जोडीदारापाशी मन मोकळे करून पहावे आणि आत्मनिर्भर व्हा. निर्णय विचारपूर्वक आणि स्वतःच्या हिंमतीने घेऊन मग ते अंमलात आणा आणि अनुभवींचा सल्ला घेणे हिताचे.
वृश्चिक (Scorpio) : सहकारी लोकांची चांगली साथ मिळेल आणि कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात आणि कामानिमित्त प्रवास घडेल. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा आणि खरेदीचा योग आहे. खर्च वाढेल. गरज ओळखून निर्णय घेणे हिताचे आणि दिवस मजेत जाईल.
धनु (Sagittarius) : चिकाटीने कामे करून दाखवाल आणि विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. धार्मिक कामात मदत करावी आणि चांगला मित्र जोडणे हिताचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभाचे आणि योग्य अयोग्य समजून घेऊन मग निर्णय घेणे हिताचे.
मकर (Capricorn) : आधुनिक गोष्टी जाणून घ्याव्यात आणि हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील आणि झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात आणि विशेष प्रयत्न करणे लाभाचे. दिवस प्रगतीचा आणि उत्साह वाढेल. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ (Aquarious) : काही कामे रेंगाळून पडू शकतात आणि चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत आणि अनावश्यक खर्च टाळावा. मागचा-पुढचा नीट विचार करावा आणि चिंतामुक्त व्हाल. दिवस मजेत जाईल. स्वतःच्या मर्जीचे मालक असाल आणि स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ काढाल.
मीन (Pisces) : पारंपरिक कामात यश येईल आणि वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत आणि मोहात अडकू नका. स्पष्ट विचार नोंदवा. प्रतिष्ठा वाढेल आणि इतरांवर प्रभाव टाकाल. निर्णय घेऊन कामं वेगाने पूर्ण कराल आणि प्रगती होईल.
हे हि वाचा : खाद्यतेल स्वस्त होणार? आज IMC च्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता