milk production: दुधासाठी दुसऱ्या वेतातील जनावरे का निवडावीत? 2022 - डिजिटल शेतकरी

milk production: दुधासाठी दुसऱ्या वेतातील जनावरे का निवडावीत? 2022

milk production: दुग्धव्यवसाय आर्थिक दृष्ट्या परवडण्यासाठी आपल्या गोठ्यात जातिवंत दुधाळ गायी-म्हशी (cow buffalo) असल्या पाहिजे आणि दुधाळ जनावरांचे काही खास गुणधर्म असतात. या गुणधर्माचा विचार करूनच जनावरांची खरेदी केली पाहिजे. फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी एका वेतातील गायीचे दूध उत्पादन साधारणपणे कमीतकमी ३६०० लिटर असायला हवे आहे.milk production

दुधाच्या व्यवसायासाठी जनावरे निवडताना नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील (lactation) जनावरे निवडावीत आणि त्यांचे वय साधारणपणे ३ ते ४ वर्षाचे असावे. कोणत्याही दुधाळ जनावरांमध्ये एका ठराविक वयापर्यंत, वेतांमध्ये दूध उत्पादन (milk production) वाढत जात असते.

पहिलारू कालवड असल्यास पहिल्या वेतापेक्षा दुसर्‍या वेतात दूध उत्पादनात वाढ दिसून येत असते. जनावरांच्या वयानुसार त्यांच्या वजनात वाढ होत असते. कासेची वाढ देखील चांगली होत असते आणि सडाचे आकारमान वाढत असते. यासर्व कारणामुळे जनावरांच्या दूध उत्पादन क्षमतेत आधीच्या वेताच्या तुलनेत वाढ दिसून येत असते.

साधारणपणे गायी-म्हशी त्यांच्या पूर्णक्षमतेनुसार जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन हे चौथ्या आणि पाचव्या वेतात देत असतात तसेच पुढील वेतातील दूध उत्पादन स्थिर राहून त्यापुढील वेतातील दुधाचे उत्पादन कमी-कमी होत जाते. सर्वसाधारणपणे आपल्याकडील दुधाळ जनावरे चौथ्या किंवा पाचव्या वेतात किती दुधाचे उत्पादन देऊ शकतील आणि  याचा अंदाज पशुपालक पहिल्या वेतातील दूध उत्पादनावरून बांधू शकतात.

यासाठी खालील सुत्राचा वापर करावा-

चौथ्या किंवा पाचव्या वेतातील दूध उत्पादन काढण्यासाठी = पहील्या वेतातील एकुण उत्पादन X १.३

पहिलारू गायीचे पहिल्या वेतातील दूध उत्पादन २००० किलो इतके असते.

तर चौथ्या किंवा पाचव्या वेतात ती गाय २००० X १.३ = २६०० किलो दुधाचे उत्पादन देईल.

हे हि वाचा : मुक्त संचार गोठा फायद्याचा का आहे?

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment