गहू खत,पाणी, रोग व्यवस्थापन(Wheat Fertilizer) 2022 - डिजिटल शेतकरी

गहू खत,पाणी, रोग व्यवस्थापन(Wheat Fertilizer) 2022

खते व्यवस्थापन(Wheat Fertilizer)

Wheat Fertilizer: बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत दयावे लागत असते. बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी दर हेक्टरी १२५ किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४५ किलो पालाश दयावे. निम्मे नत्र व संपूर्ण स्फूरद आणि पालाश पेरणीच्यावेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ ते साडेतीन आठवडयांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी दयावे आणि उशिरा केलेल्या पेरणीसाठी हे(Wheat Fertilizer) प्रमाण हेक्टरी ८०-८५  किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश इतके दयावे. निम्मे नत्र व स्फूरद आणि पालाश पेरणीच्या वेळी व उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर ३ आठवडयांनी दिले पाहिजे.

िरायत गव्हासाठी पेरणीच्या वेळेस हेक्टरी ४०-४५  किलो नत्र आणि २० किलो स्फुरद पेरून दयावे. पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना २-२.५०  टक्के युरीयाची फवारणी करावी. पश्चिम महाराष्ट्रातील मैदानी खोल काळया जमिनीवर गव्हाच्या उत्पादनाकरीता पेरणीपूर्वी प्रती हेक्टर १ टन शेणखत देवून गव्हाची पेरणी जोड ओळीत (१५ ते ३० सें.मी.) करून प्रती हेक्टर ७०:३५ नत्र-स्फुरद किलो, युरिया-डीओपी ब्रिकेट मार्फत (२.८ ग्रॅम वजनाची ब्रिकेट) १५ सें.मी. अंतराच्या जोड ओळीत प्रत्येकी ३० सें.मी. अंतरावर १०-१२  सें.मी. खोल खोचावी.

पश्चिम महाराष्ट्राच्या मैदानी प्रदेशातील लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीमध्ये गव्हाचे अधिक उत्पादन, अर्थिक फायदा व जमिनीतील लोहाची पातळी राखण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांसोबत (१२०:६०:४० नत्रःस्फुरदःपालाश किलो प्रती हेक्टर अधिक १०-११ टन शेणखत प्रती हेक्टरी, मुरविलेले हिराकस २०-२२  किलो प्रती हेक्टरी (१०० किलो शेणखतात १५-१७  दिवस मुरवून) जमिनीतून दयावे.

महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात गव्हाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी(Wheat Fertilizer) शिफारशीत अन्नद्रव्यांची मात्रा देऊन २-३% १९:१९:१९ नत्र : स्फुरद : पालाश या विद्राव्य खताची किंवा २% डि.ए.पी. या खतांची पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसानंतर फवारणी करण्यात यावी. वेळेवर पेरणीसाठी १२०:६०:४०, तसेच उशीरा पेरणीसाठी ९०:६०:४० नत्रःस्फुरदःपालाश कि./हे. दिले पाहिजे. विद्राव्य खत फवारणीसाठी २-३ % द्रावणाकरीता २०० ग्रॅम १९:१९:१९ किंवा डी.ए.पी.खते १०-११ लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

पश्चिम महाराष्ट्रातील गव्हाचे उत्पादन लक्ष ४५ चे ५२ क्विंटल प्रति हेक्टर साध्य करण्यासाठी जमिनीची सुपिकता कायम ठेवण्यासाठी व संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी खालील शेणखतासोबत अथवा शेणखत विरहित उत्पादन उद्दिष्ट समिकरणांचा वापर करावा असतो.

शेणखतासोबत अपेक्षित उत्पादन समीकरण(Wheat Fertilizer)

खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. = (७.४२ x अपेक्षित उत्पादन टन/हे) – (०.८९ x जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.) – (२.४५ x शेणखत टन/हे.)द्यावे.

खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. = (१.७९५ अपेक्षित उत्पादन टन /हे.) – (१.४७ ४ जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.) – (०.३३ x शेणखत टन /हे.) द्यावे.

खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. = (४.७८ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) – (०.४७४ जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.) – (०.६५ x शेणखत टन/हे.) द्यावे.

शेणविरहित अपेक्षित उत्पादन समीकरण

खतामधून द्यावयाचे नत्र कि./हे. = (८.०९५  अपेक्षित उत्पादन टन/हे.) – (०.९६ ४ जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.) द्यावे.

खतामधून द्यावयाचे स्फुरद कि./हे. = (२.२७ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) – (१.८६ – जमिनीतील उपलब्ध स्फुरद कि./हे.) द्यावे.

खतामधून द्यावयाचे पालाश कि./हे. = (५.५५ x अपेक्षित उत्पादन टन/हे.) – (०.५४ ४ जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.) द्यावे.

पाणी व्यवस्थापन

गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी आणि पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया दयाव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी दयावे लागत असते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरत असते.

१. मुकुटमुळे फुटण्याची अवस्था : पेरणीनंतर १८ ते २० दिवस

२. कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर ४० ते ४६ दिवस

३. फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ६० ते ६६ दिवस

४. दाणे भरण्याची अवस्था : पेरणीनंतर ८० ते ८६ दिवस

पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळया पुढीलप्रमाणे दिले तरी चालतात.

१. गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४३ दिवसांनी दयावे.

२. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २३ , दुसरे पाणी ४० ते ४५ व तिसरे पाणी ६० ते ६४  दिवसांनी दयावे.

अपुरा पाणीपुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे त्या क्षेत्रात पंचवटी (एन आय डी डब्ल्यु-१५) किंवा नेत्रावती (एन आय ए डब्ल्यू-१४१५) गव्हाच्या वाणांचा वापर करावा आणि गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते व दोन पाणी दिले तर उत्पादनात २०-२२ टक्के घट येते.

आंतरमशागत

गव्हात चांदवेल, हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होत असतो. त्याकरीता जरूरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी आणि आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होत असते. गहू पिकातील अरूंद पानांचे आणि रूंद पानांच्या तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर ३० ते ३६ दिवसांनी दरहेक्टरी आयसोप्रोटयुरॉन (५०%) दोन ते तीन किलो किंवा मेटसल्फ्यूरॉन मथाईल (२०%) हेक्टरी २०-२५ ग्रॅम किंवा २, ४-डी (सोडीयम) अधिक २-२.५० टक्के युरिया ६०० ते १२५० ग्रॅम ६०० ते ८०० लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या २ ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर १० ते १४ दिवस पाणी देऊ नये.

पीक संरक्षण

गहु या पिकास तांबेरा व उंदीर यांच्यापासून जास्त नुकसान पोहचत असते. काळा व नारंगी तांबेरा हे दोन्ही महत्वाचे हानीकारक रोग आहेत. आणि या काळया तांबेऱ्यामुळे उत्पादनात २५ ते ६० टक्के घट येते. नारंगी तांबेऱ्यामुळे काळया तांबेऱ्यापेक्षा नुकसान कमी होते तसेच विदयापीठाने विकसीत केलेल्या तांबेरा प्रतिबंधक वाणांचीच पेरणीसाठी निवड करावी. तांबेरा प्रतिबंधक उपाय म्हणून गव्हाची पेरणी वेळेवर करावी आणि पिकास पाणी जरूरी पुरतेच व बेताचे दयावे. तांबेरा दिसू लागताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशके १.५ किलो ५०० लिटर पाण्यातून फवारावे. आणि जरूरी भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५-१६  दिवसांनी करावी.

गव्हावर करपा रोगाचा देखील प्रादुर्भाव दिसून येत असतो. करपा रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोगाचे लक्षणे दिसू लागताच मॅन्कोझेब (०.२ टक्के) या बुरशीनाशकाच्या मिश्रणाच्या दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने करून घ्याव्या.

मावा या किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम २५ डब्ल्यूजी ५०-५५ ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. गहू बियाणे साठवणुकीच्या काळात सोंडेकिडीच्या नियंत्रणासाठी, उन्हात वाळविलेल्या बियाण्यास प्रती किलो १०-१२ ग्रॅम याप्रमाणे वेखंड भुकटीची बीजप्रक्रिया करावी.

कापणी व मळणी

पीक तयार होताच वेळेवर कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास एन आय-५४३९ व त्र्यंबक (एन आय ए डब्ल्यू३०१) या गव्हाच्या वाणाचे दाणे शेतात झडू शकतात म्हणून पीक पक्व होण्याच्या २-३ दिवस अगोदर कापणी करावी. कापणीच्यावेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५-२० टक्के असावे. गव्हाची मळणी, यंत्राच्या सहाय्याने करावी किंवा गव्हाची कापण व मळणी कंबाईन हार्वेस्टर मशीनने करण्यात यावी.

हे हि वाचा ; उसाच्या ‘एफआरपी’बाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांचा होणार फायदा…

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

 

1 thought on “गहू खत,पाणी, रोग व्यवस्थापन(Wheat Fertilizer) 2022”

Leave a Comment