Edible Oil : खाद्यतेलाचे भाव कमी होणार की वाढणार? 2023 - डिजिटल शेतकरी

Edible Oil : खाद्यतेलाचे भाव कमी होणार की वाढणार? 2023

Edible Oil : भारतातील आयातदार जास्त किंमत देण्यात तयार असूनही त्यांना पुरेसं तेल देशात आणता येत नव्हतं आणि सुदैवाने मागच्या वर्षी जून महिन्यात इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवले आणि पुरवठा पूर्ववत होऊन दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.Edible Oil

जागतिक पातळीवर शेतीमालाची (Agriculture produce) पुरवठासाखळी अजून रूळावर आलेली नाही आणि यंदा हवामानाने (Climate Change) दगा दिला तर बाजारपेठेत हस्तक्षेप करण्यासाठी विविध देशांच्या सरकारांकडं मर्यादित साठा असणार आहे आणि त्या परिस्थितीत प्रत्येक देश हा आपल्या देशातील ग्राहकांचा विचार करून व्यापार धोरण ठरवेल आहे. ते कसे असेल, हे भारत, अर्जेंटिना, इंडोनेशिया, मलेशिया या देशांनी विविध शेतमालाच्या निर्यातीवर बंधनं टाकून यावर्षी दाखवून दिलं आहे.

त्यांनी जागतिक व्यापार संघटनेचे नियम, प्रचलित संकेत सर्व झुगारून तातडीनं आपल्या देशातील ग्राहकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण अन्नधान्याच्या दरवाढीनं सत्ताधारी अप्रिय बनण्यासोबत प्रत्येक देशात महागाईचा निर्देशांक वाढत गेला आहे.Edible Oil

अशा बंधनांचा आयातदार देशातील ग्राहकांना कसा फटका बसतो याचा चांगलाच अनुभव भारतीय ग्राहकांनी यावर्षी घेतला आहे आणि रशिया-युक्रेन युध्दामुळे सुरुवातीला सूर्यफूल तेलाची आयात विस्कळीत झाली.

पाठोपाठ इंडोनेशियानं पाम तेलाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहे. त्यामुळे एका वर्षात खाद्यतेलाचे दर जवळपास दुप्पट झाले आहे. एरवी पामतेल हे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलापेक्षा स्वस्त असते आहे परंतु या जागतिक घडामोडींमुळे पामतेल काही दिवसांसाठी चक्क सूर्यफूल आणि सोयातेलापेक्षा महाग झालेEdible Oil आहे.

भारतातील आयातदार जास्त किंमत देण्यात तयार असूनही त्यांना पुरेसं तेल देशात आणता येत नव्हतं आणि सुदैवाने मागच्या वर्षी जून महिन्यात इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवले आणि  पुरवठा पूर्ववत होऊन दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

मात्र अतिवृष्टीनं इंडोनेशिया आणि मलेशियातील पाम तेलाच्या फळांची काढणी करणं अवघड झालं आहे. त्यातच करोनाच्या संक्रमणामुळे मलेशियात पुरेसे स्थलांतरित कामगार नाहीत आणि तर दुसरीकडे रशिया-युक्रेनमधील युद्ध अजून सुरूच आहे.

जागतिक अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असतानाही खनिज तेलाचे दर ८० डॉलर पेक्षा अधिक आहे आणि यामुळे इंडोनेशिया आणि युरोपमधील अनेक देशात पामतेलाचा वापर बायोडिझेलसाठी करणं शक्य झालं आहे. तर अमेरिकेत सोयातेलाचा आणि मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलचा वापर इंधनात वाढत गेली आहे.

गरीब देशातील ग्राहकांना खाद्यतेलाच्या महागाईचे चटके बसत असतानाही विकसित देशांनी अन्नधान्याचा इंधनात वापर करण्याच्या आपल्या धोरणात बदल केलेला गेला नाही.

किंबहुना ते अधिक जोरकसपणे राबवत आहेत आणि येणाऱ्या हिवाळ्यात जर खरोखरच रशियाने युरोपचा गॅस पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी केला तर कदाचित बायोडिझेलवर जनरेटर चालून विजेची निर्मिती करण्याची वेळ काही युरोपियन देशांमधील ग्राहकांवर येणार आहे.Edible Oil

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी हिवाळ्यात युक्रेनच्या नाड्या आवळण्यासाठी जोर वाढवला तर कदाचित युक्रेनमध्ये येत्या हंगामातील सूर्यफूल, मका आणि गहू यांचा पेरा कमी होऊन पुढील हंगामात जगातील मागणी-पुरवठ्याचे गणित बिघडणार आहे. आणि त्यामुळे भारतात तेल्याच्या किमती वाढू शकतात.

हे हि वाचा : सीताफळ बागेचे व्यवस्थापन 

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment