Land gift deed Certificate? | जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? 2023 - डिजिटल शेतकरी

 Land gift deed Certificate? | जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? 2023

Land gift deed Certificate: रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला मालमत्ता बक्षीस रुपाने देताना भविष्यात वाद उद्भवू नयेत, यासाठी कायदेशीररीत्या बक्षीसपत्र तयार करून देणे महत्त्वाचे ठरत  असते. यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते आणि मालमत्तेची किंमत आणि स्थानानुसार ही रक्कम बदलते. शुल्क भरल्यानंतर भेट पत्राची नोंदणी स्थानिक दुय्यम निबंधक कार्यालयात करणे आवश्यक आहे तसेच नोंदणी दस्तऐवजाला कायदेशीर वैधता प्रदान करते.( Land gift deed Certificate)

जमीन बक्षीसपत्र म्हणजे काय?

रक्ताच्या नात्यात मालमत्तेचे व्यवहार करताना भविष्यातील वाद टाळण्यासाठी बक्षीसपत्राची कायदेशीर प्रक्रिया केली जात असते.

मुद्रांक शुल्क किती?

त्या मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार मुद्रांक शुल्क ३ टक्के आकारले जात असते. पत्नी, मुलगा, मुलगी अथवा नातवंडे या रक्तातील नात्यात मुद्रांक शुल्कात सवलत मिळत असते.

रजिस्ट्री करताना काय काळजी घ्याल?

मालमत्ता बक्षीसपत्र करताना त्याची रजिस्ट्री दुय्यम निबंधक कार्यालयात केली जात असते. आई-वडील मुलांना देत असलेल्या बक्षीसपत्राच्या दस्तात भविष्यात ही मिळकत त्यांच्या संमतीशिवाय मुलांनी विकू नये, असे नमूद केले जात असते.

ह्यासाठी कुणाच्या आणि किती सह्या आवश्यक

हे बक्षीसपत्र कायदेशीररीत्या ग्राह्य धरले जात असल्याने बक्षीसपत्र करताना चांगल्या वर्तणुकीच्या दोन साक्षीदारांच्या सह्या या बक्षीसपत्रावर घेतल्या जात असतात. Land gift deed Certificate

देणारे, घेणारे उपस्थित राहणे अनिवार्य

बक्षीसपत्र करणारा आणि ज्याच्या नावे बक्षीसपत्र करावयाचे तो, अशा दोन्ही व्यक्ती बक्षीसपत्र करताना दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.

हे हि वाचा : पहिले खरेदीखतच कायदेशीर जमीन खरेदी करण्यापूर्वी…

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment