cooking food in a clay pot: नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला गेला आहे.
आरोग्य विभांगाकडून बालकांमधील कुपोषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे आणि नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला गेला आहे.
जयपूरच्या अमृत माटी इंडिया ट्रस्टने केलेल्या संशोधनात मातीत विविध प्रकारचे पोषक घटक असतात आणि त्यामुळे मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवल्यामुळे ते अधिक पोषक होतात. एवढेच नव्हे, तर महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासही मदत होणार आहे.
पचन होईल योग्य cooking food in a clay pot
मातीच्या भांड्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येत असते. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होत असते.
पोषणमूल्ये कोणात किती?
घटक प्रेशर कुकर मातीची भांडी
कर्बोदके ४१.५७ ग्रॅम ५०.७३ ग्रॅम
फायबर ९. ६४ ग्रॅम १६.६४ ग्रॅम
प्रोटिन ११.१९ ग्रॅम १३.०८ ग्रॅम
व्हिटॅमिन ए ० मिलिग्रॅम १००.५ मिलिग्रॅम
व्हिटॅमिन सी १.७३ मिलिग्रॅम ३.७९ मिलिग्रॅम
कॅल्शियम ११.९७ मिलिग्रॅम ३६.५३ मिलिग्रॅम
लोह २.७५ मिलिग्रॅम ३.८१ मिलिग्रॅम