PM Kisan Scheme: नमो सन्मानबरोबर पीएम किसानचाही हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का? पाहा अपडेट - डिजिटल शेतकरी

PM Kisan Scheme: नमो सन्मानबरोबर पीएम किसानचाही हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का? पाहा अपडेट

PM Kisan Scheme : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने काल(ता.१०) मंगळवारी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहीत मंत्रीमंडळात देण्यात आली आहे.PM Kisan Scheme

दरम्यान केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ताही लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि दोन हजार रुपयांचा हा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पीएम किसानचा हफ्ता मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना फेब्रुवारी २०१९ पासून आर्थिक मदत केली जात आहे आणि यासह ८५ दशलक्ष (सुमारे ८.५ कोटी) कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित केली होती.

केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्यास ६ हजार रुपये अनुदान मिळते आणि यात राज्याच्या आणखी ६ हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो महासन्मान निधी योजना राबविण्यास जून २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली गेली होती.PM Kisan Scheme

याचबरोबर निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार आहे आणि पीएम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्यूल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटीकडून गतीने सुरु आहे.  तसेच तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.PM Kisan Scheme

वराहपालनासाठी मिळतंय अनुदान, कसा कराल अर्ज?

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

2 thoughts on “PM Kisan Scheme: नमो सन्मानबरोबर पीएम किसानचाही हफ्ता शेतकऱ्यांना मिळणार का? पाहा अपडेट”

Leave a Comment