Manoj Jarange : मनाेज जरांगे पाटलांची ताेफ पुण्यात धडाडणार; सभेसाठी 100 एकर जागा निश्चित - डिजिटल शेतकरी

Manoj Jarange : मनाेज जरांगे पाटलांची ताेफ पुण्यात धडाडणार; सभेसाठी 100 एकर जागा निश्चित

मराठा आरक्षण (Maratha Reservation) साठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची गेल्या आठवड्यात जंगी सभा झाली तसेच रेकाॅर्ड ब्रेक सभेत जरांगे पाटील राज्य सरकारला दहा दिवसांचा वेळ देत इशारा दिला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) मधील लाखोंच्या सभेनंतर आता जरांगे पाटील यांची तोफ आता २० ऑक्टोबर रोजी पुणे (Pune) जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे धडाडणार आहे आणि त्यासाठी शंभर एकर जागा निश्चित करण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांनी नुकताच राज्यभर दाैरा करून मराठा आरक्षणाचा आवाज बुलंद केला आहे आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन राज्याचे नव्हे, तर देशाचे लक्ष वेधले आहे. १४ ऑक्टोबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे त्यांची विराट सभा झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे आणि आता अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange)सभा घेणार आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे या सभेची तयारी केली जात आहे.

अंतरवली सराटीनंतर सरळ पुणे जिल्ह्यात जाहीर व्यासपीठावरुन मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) बोलणार आहे आणि जरांगे पाटील यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. अगदी मध्यरात्री किंवा पहाटे झालेल्या सभांनाही चांगली गर्दी झाली होती. मराठा क्रांती मोर्चातर्फे ५ लाख मराठा बांधव राजगुरुनगर येथील सभेला येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सभेसाठी शंभर एकर जागा निश्चित केली आहे आणि या जागेची पाहणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि पोलिसांनी केली. आता पुणे येथील सभेत जरांगे पाटील काय बाेलणार, याचीच चर्चा सर्वत्र रंगली गेली आहे.

विद्यार्थ्यांसाठी विशेष विमा योजना जाहीर, 20 रुपयांपासून सुरू होणार प्रीमियम

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment