Kunbi documents: हिंगोली – मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्रे देण्यासाठी नेमलेली शिंदे समिती व मागील दोन महिन्यांत दिलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा आणि ज्या सवलती सारथीच्या माध्यमातून मिळतात, त्या ओबीसींनाही द्या, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोली येथील ओबीसी एल्गार महामेळाव्यात रविवारी केली आहे.Kunbi documents
रामलीला मैदानावर झालेल्या या सभेस प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, खा. रामदास तडस, आ. प्रज्ञा सातव, आ. राजेश राठोड, टी. पी. मुंडे, माजी खा. समीर भुजबळ, माजी आ. रामराव वडकुते, बबन तायवाडे आदी ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले, जाळायला अक्कल लागत नाही, जोडायला अक्कल लागते. एकीकडे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत तर दुसरीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात दाद मागत आहेत आणि जे ओबीसीत आहेत, ते कसे चुकीचे आहेत, असे सांगून आमचे काढून त्यांना आरक्षण मागण्याचा डाव आखला जात आहे.
जातनिहाय गणना होऊनच जाऊ द्या
राहुल गांधी, शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळे ही सगळीच मंडळी जातनिहाय जनगणनेची मागणी करीत आहे आणि एकदा अशी गणना होऊनच जाऊ द्या. बिहार करू शकते तर महाराष्ट्र का नाही करू शकत?
– छगन भुजबळ, मंत्री तथा ओबीसी नेते
लायकी काढण्याचे कुणी सांगितले?
– उपोषणकर्ते नेते म्हणतात की, ओबीसींच्या हाताखाली काम करणे शोभत नाही आणि आमची लायकी नाही. लायकी होती म्हणूनच अठरा पगड जातीतील शूरवीर छत्रपती शिवरायांसोबत लढले, असे भुजबळ म्हणाले..
-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ओबीसी उमेदवार खुल्या गटाच्या बरोबरीची किंबहुना त्यापुढेही गुणवत्ता सिद्ध करीत असल्याचे सांगताना आकडेवारीचा दाखलाच छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणातून दिला आहे.
मराठ्यांना नव्हे, झुंडशाहीला विरोध
आमचा गरीब मराठ्यांना विरोध अजिबात नाही. मात्र जाळपोळ करणाऱ्या झुंडशाहीला विरोध आहे तसेच अंतरवाली प्रकरणातील आरोपी बेदरेकडे पिस्तूल आढळले. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली जर कुणाला गावबंदी केली तर एक महिन्याची शिक्षा होऊ शकते. मग पोलिसांनी आतापर्यंत कुणावरच का कारवाई केली नाही? असा सवालही भुजबळ यांनी उपस्तीत केला आहे.Kunbi documents
1 thought on “Kunbi documents: दाेन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करा, शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळ यांची मागणी”