Reels :बघाव तेव्हा बायको मोबाइलवर, नवऱ्याने उचलला चाकू अन्... - डिजिटल शेतकरी

Reels :बघाव तेव्हा बायको मोबाइलवर, नवऱ्याने उचलला चाकू अन्…

Reels: रिल्स बनवून समाजमाध्यमांवर टाकण्याचे वेड अनेकांना लागले आहे.आणि मात्र अशा वेडापायी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोलकात्याच्या हरिनारायणपूरमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत रिल्स बनवते, ‘मेटा’वर अनोळखी मित्रांशी बोलते म्हणून तिचा गळा चिरून खून केला आहे.Reels

आरोपीला दोन मुले आहेत आणि घटनेच्या दिवशी मुले घरी नव्हती. सातवीत शिकणारा मुलगा परत आला तेव्हा त्याला आईचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसला होता. परिमल वैद्य असे आरोपीचे नाव आहे. त्याचा विवाह अपर्णा नावाच्या महिलेशी झाला होता तसेच महिला सतत रिल्स बनवत असे, अनोळखी व्यक्तींसोबत ‘मेटा’वर बोलत असे. पतीने याला अनेकदा विरोध केला गेला होता.

घटनेच्या दिवशीही त्याचा पत्नीशी वाद झाला होता आणि भांडण इतके वाढले की, त्याने जवळच ठेवलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीच्या मानेवर वार केले. हल्ला केल्यानंतर परिमल घरातून पळून गेला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.हे वृत्त मराठी लोकमत वरून घेतले आहे.Reels

दाेन महिन्यांत दिलेले कुणबी दाखले रद्द करा, शिंदे समिती बरखास्त करा : भुजबळ यांची मागणी

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp चॅनल फॉलो करा. फॉलो नसेल होत तर Whatsapp अपडेट करा

Leave a Comment