Aadhaar Update: डिसेंबर हा यावर्षीची अखेरचा महिना आहे तसेच आर्थिक घडामोडींच्या दृष्टीने हा महिना महत्त्वाचा आहे. अनेक महत्त्वपूर्ण कामे या डिसेंबरमध्ये उरकून घ्यावे. त्यात दिरंगाई झाल्यास बराच त्रास सहन करावा लागू शकत आहे आणि ही कामे कोणती? जाणून घेऊ या….Aadhaar Update
म्युच्युअल फंडातील नामांकन आवश्यक
Mutual funds: म्युच्युअल फंडाच्या फोलिओमध्ये नामांकन जोडणे बंधनकारक आहे.आणि यासाठी ३१ तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे नामांकन नसेल तर १ जानेवारीपासून फोलिओतून विक्री व इतर व्यवहार करता येणार नाही.
आधारचे अपडेट
Aadhaar Update: आधार कार्ड काढून १० वर्षे झाली आणि एकदाही त्यातील माहिती अपडेट केलेली नाही, अशा लोकांसाठी १४ डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट करण्याची मुदत आहे तसेच ऑनलाइन अपडेट मोफत करता येईल. त्यानंतर अपडेट केल्यास शुल्क आकारण्यात येणार आहे. आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी तुम्ही myaadhaar.uidai.gov.in ला भेट देऊ शकता. 14 डिसेंबरपर्यंत आधार अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत.
अग्रीम आयकर भरणा व आयकर विवरण
income tax: ज्यांचे आयकर दायित्व १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे आणि अशा करदात्यांना अग्रीम कर भरावा लागतो. अग्रीम कराचा तिसरा हप्ता भरण्यासाठी डिसेंबरची मुदत आहे. १५ डिसेंबरपूर्वी करदात्यांना ७५ टक्के अग्रीम कर भरणे बंधनकारक आहे आणि सुधारित आयकर भरणे किंवा आयकर भरण्यास उशीर झाला असेल तर ३१ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ठराविक दंड भरून हे काम करता येणार आहे,
याकडेही लक्ष असू द्या
अनेक बँकांमध्ये लॉकर सुविधा घेणाऱ्यांना डिसेंबरमध्ये कराराचे नूतनीकरण करावे लागते आणि ते करून घ्या.आरबीआय ८ तारखेला पतधोरण जाहीर करणार आहे.
यूपीआय आयडी होईल निष्क्रीय
UPI: नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल पे, फोन पे किंवा पेटीएमला एका वर्षापेक्षा जास्त काळ सक्रिय नसलेले यूपीआय आयडी निष्क्रिय करण्यास सांगितले आहे आणि याकरता 31 डिसेंबर 2023 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.अशी निष्क्रिय खाती पुन्हा सुरू केली जाऊ शकतात. परंतु यासाठी किमान एक व्यवहार करणे आवश्यक आहे.Aadhaar Update