Breeding Management: गाय, म्हैस सदोषतेमुळे उलटते, यात विशेष तसेच काही नाही. पण महिनोन् महिने सतत उलटत राहिल्याने होणारे आर्थिक नुकसान फार मोठे असते अणि सतत उलटणाऱ्या जनावरात नेहमी फार मोठे खर्चिक उपचार केले जातात आणि त्यातून फायदा अत्यंत कमी दिसून येतो असतो, कारण असे उपचार ‘निदान न करता’ होतात, याची जाणीव असूनही पशुपालक सदैव गप्पच असतात अणि यासाठी पशू तपासणी महत्वाची असते Breeding Management..
प्रसूतीनंतर तिसऱ्या महिन्यात गाय आणि चौथ्या महिन्यात म्हशी पुन्हा गाभण राहण्यासाठी सोपे अणि बिन खर्चिक, अल्पश्रमिक, आवश्यक आणि उपयुक्त प्रयत्न करण्यासाठी गोठ्यात कार्यपद्धतीचा तक्ता हवा.
१.प्रसुतीनंतरचा पहिला माज दिवस = गाय ६०, म्हैस ९०..
२.प्रसुतीनंतरचा पहिला माज= रेतनासाठी नेहमी अयोग्य,.
३.पहिल्या माजाचा कालावधी= तासात नोंद करा,.
४.पहील्या माजाचा बळस = तार लोंबत फोटो आवश्यक,.
५.सामान्य माजाचा बळस/ सोट/ स्राव रंगहीन, पारदर्शक, वासरहित, स्वच्छ , घट्ट, सहज न तुटणारा,.
६.गर्भाशयदाह बळस=पांढरट/ धुरकट/ पिवळसर/दहीरंग ७.गर्भाशयदाह बळस = बळसाची प्रयोगशाळा तपासणी आवश्यक,.
८.गर्भाशय दाह= उपचार आवश्यक, पशुवैद्यकीय सल्ला.
९.शरीर वजन नोंद= पहिल्या माजापासून दर ७ दिवसास,.
१०.प्रसूतीनंतर दुसरा माज= पहिल्या माजानंतर २१ दिवस,.
११.प्रसूतीनंतर दुसरा नियमीत माज= रेतन योग्य माज,.
१२.रेतन योग्य माज= पशुवैद्यकीय खात्री आवश्यक,.
१३.रेतन योग्य माज = सामू ७.०० खात्री आवश्यक,.
१४.रेतन योग्य माज= तिसऱ्या टप्प्यात रेतन आवश्यक,.
१५.रेतमात्रा निवड= पैदास धोरणानुसार अचूकता,.
१६.रेतन योग्य माज= सहज, सुलभ, ताणरहित रेतन,.
१७.रेतनानंतर पुन्हा रेतन= २४ तास अंतरानंतर,.
१८.योग्य रेतन = अनुभवी, प्रशिक्षित तंत्रज्ञ आवश्यक,.
१९.योग्य रेतन = तापमापक, ३७ अंश सेल्सिअस पाणी आवश्यक,.
२०.योग्य रेतन नोंद = रेतनानंतर रेतमात्रा जपून ठेवणे,.
२१.रेतनानंतर निरीक्षण = माज लक्षणांसाठी २४ तास,.
२२.माजानंतर रक्तस्राव = सामान्यपणे दोन दिवसानंतर,.
२३.माजानंतर रक्तस्राव = शरीरक्रियेसाठी उपचार नकोत,.
२४.माजानंतर पूरक उपाय = क्षार, गूळ, शतावरी,.
२५.मध्यचक्र माज = रेतनानंतर १० दिवसास,.
२६.मध्यचक्र माज = रेतन नको, स्रीबीज सुटत नाही,.
२७.प्राथमिक गर्भधारणा चाचणी= रेतनानंतर १२ दिवसांपासून,.
२८.प्राथमिक गर्भधारणा चाचणी = मूत्रातील बीज उगवण प्रतिबंध,.
२९.प्राथमिक गर्भधारणा चाचणी= पशुपालकाकडून घरच्याघरी,.
३०.रेतनानंतर २१वा दिवस= माज लक्षणे अपेक्षित नाही,.
३१.रेतनानंतर २१वा दिवस= माज लक्षणे म्हणजे विफल गर्भधारणेचे संकेत,.
३२.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=रेतनानंतर २१-२५ दिवस सोनोग्राफी सुविधा आवश्यक,.
३३.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=पशुवैद्यक सहाय्य आवश्यक,.
३४.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=गोठ्यात, सुलभ चाचण्या शक्य,.
३५.अधुनिक गर्भधारणा पडताळणी=तात्काळ निदान देणाऱ्या चाचण्या उपलब्ध,.
३६.अधुनिक गर्भधारणा पडताळणी= रु ३००-३५० किंमत,.
३७.गर्भधारणा निदान=सोनोग्राफीद्वारे तपासणी,.
३८.गर्भधारणा निदान =सोनोग्राफी सुरक्षित,खात्रीशीर,.
३९.रेतनानंतर पाठपुरावा= २१, ४२, ६३ दिवसास निरीक्षण,.
४०.गर्भधारणा= निदानानंतर खात्री नेहमी आवश्यकच,.
४१.गर्भधारणा खात्री= गाय साठवा, म्हैस सत्तरावा दिवस,.
४२.गर्भधारणा खात्री= पशुवैद्यकाकडून तपासणी,.
४३.कालवड- रेडी पहिला माज=अनुक्रमे १०, १८ महिने वयास,.
४४.कालवड-रेडी पहिला माज=अनुक्रमे २५० ते २७५ किलो शरीरवजन,.
४५. कालवड/रेडी पहिला माज= पशुवैद्यकीय तपासणी अनिवार्य,.
४६. कालवड/ रेडी पहिला माज= सामान्य प्रजनन संस्थेची खात्री,.
४७. कालवड/ रेडी पहिला माज= रेतनास अयोग्यच,.
४८. कालवड/ रेडी माजचक्र = सुरुवातीला अनियमित,.
४९. कालवड/ रेडी माजचक्र = ३/४ माजास नियमित,.
५०.कालवड/ रेडी रेतन= पहिल्या नियमित माजास,.
५१.कालवड/ रेडी माज= कालावधी+लक्षणे कमीच,.
महत्त्वाचे मुद्दे Breeding Management
१. कोरडा गोठा महत्वाचा.
२. वेळेवर माज, परिपूर्ण आहाराची हमीच
३. एका माजचक्राचे नुकसान, किमान चार हजार
४. माजाचा जास्त काळ, स्त्रीबीज सुटण्यास विलंब
५. माजाचा खराब बळस, सुप्त गर्भाशय दाह
६. सतत माज, सदाफळी वंध्यत्वाचा प्रकार
७. अनियमित माज, रेतनास अपात्र
८. पहिला माज, रेतनास नेहमी अपात्र
९. अधिक प्रमाणात स्त्राव, रेतनास अपात्र माज
१०. माजानंतर रक्तस्त्राव, आधीच संपलेला माज
११. महाग प्रतिजैविक इंजेक्शने, परिणाम अनिश्चित
१२. गर्भाशयात औषधी, अपुराच होतो उपचार
१३. निदानाशिवाय उपचार, निरुपयोगी खर्च
१४. लिखीत नोंदींचा अभाव, तोट्याकडे वाटचाल
१५. रेतमात्रेस पर्याय वळू नाही, स्वत:ची प्रयोगशीलता टाळा
१६. रेतनच फायदेशीर, २४ प्रकारचे हमखास लाभ
१७. फार लांबलेला माज, रेतन नकोच
१८. तुटक माज, दुसर्या टप्प्यातही रेतन आवश्यक
१९. लक्षणं आधारित रेतन नको, स्त्रीबीज खात्रीच योग्य
२०. उलटण्याची कारणे हजार, कौशल्य हाच प्रहार
लक्षात ठेवा, घातक गर्भाशय दाह
१. जिवाणूमुळे होतो सौम्य/ तीव्र गर्भाशयदाह.
२. जिवाणूचे असंख्य प्रकार वातावरणात आहेत.
३. जिवाणू गोठ्यातील वातावरणात असतात.
४. सगळे जिवाणू नेहमी संधी साधू असतात.
५. मानवी चुका गर्भाशय दाहास पूरक ठरतात.
६. जिवाणूंचा गर्भाशयात चुकांमुळेच प्रवेश घडतो.
७. जिवाणू प्रवेश शरीराकडून नेहमी थांबवला जातो.
८. योनीचे पडदे, गोलाकार स्नायू जंतूप्रवेश रोखतात.
९. भरपूर स्त्राव प्रमाण जिवाणू बाहेर टाकते.
१०. जिवाणू रोग निर्माणाबाबत सतत संधी शोधतात.
११. गर्भाशयात जिवाणू अनिष्ट परिणाम करतात.
१२. शरीरावरचा ताण जिवाणूंना संधी पुरवतो.
१३. जिवाणूमुळे गर्भाशयात पू निर्माण होतो.
१४. जिवाणूंसाठी बरीच प्रतिजैविके निष्प्रभ ठरतात.
१५. दाहनिर्माण करणाऱ्या जीवाणूंचे संच बदलतात.
१६. सततचा प्रतिजैविक वापर शरीरातील प्रतिरोध वाढतो.
१७. प्रतिजैविक शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी करतात.
१८. जिवाणूमुक्त गर्भाशयासाठी उपचार खर्चिक असतो.
१९. निरोगी गर्भाशयासाठी शरीराची क्षमता वाढवावी.
२०. गर्भाशयदाह संपर्कातील जनावरात सहज पसरतो.
२१. सुप्त गर्भाशय दाह, छुपा शत्रू असतो.
२२. गर्भाशयात जिवाणूंची संख्यावाढ झपाट्याने होते.
२३. मिश्र प्रकारचे जिवाणू, नवीन गटात फोफावतात.
२४. गर्भाशयातील रोगजंतू, फलित गर्भ संपवतात.
२५. जीवाणूंनिर्मित दाह, गर्भाशयापुरताच असतो.
२६. गर्भाशयदाह प्रादुर्भाव, सतत कमी जास्त होतो.
२७. गर्भाशयदाहाचा स्त्राव कासदाह शक्यता वाढवतो.
२८. गर्भाशयदाहयुक्त जनावर वेदना दाखवत नाही.
२९. अचूक निदानाचा पाठपुरावा नेहमी अपेक्षित.
३०. गर्भाशय निरोगी तरच अधिक गर्भधारणा.
*सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव*
संघटित प्रयत्नांची गरज
- माजावर असलेल्या जनावरांचा स्वच्छ बळस माजाच्या मधल्या टप्प्यात काचपट्टीवर घेवून शाळेतसुद्धा असणाऱ्या साध्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून नेचे पानांची रचना पडताळणी आग्रहाने करावि Breeding Management.
- माजाचा बळस प्रयोगशाळेत तपासणी करून कोणते प्रतिजैविक अधिक प्रभावी याची सोय तालुक्यात उपलब्ध करून घ्यावि.
- हमखास ५० टक्के जनावरात उपयोगी ठरणारा गर्भाशय दाहावरचा उपचार म्हणजे २/३/४ % प्रमाणातील ल्युगाॅल्स आयोडीन. दुसऱ्यावेळी उलटलेल्या आणि गर्भाशय दाह हेच कारण असलेल्या प्रत्येक गायी अणि म्हशीत याच उपचाराचा आग्रह धरा.
- प्रत्येक तालुका लघु चिकित्सालयात ओझोन उपचार पद्धती सुरू करण्याची मागणी करा अणि प्रतिजैविकांवर मात आणि प्रभावी असणारी ओझोन उपचार पद्धती स्वस्त, सुरक्षित, सोपी आणि प्रभावी असल्याने सुप्त गर्भाशय दाह संपवता येत असते.
- शरीरातील रोगप्रतिकारक्षमता प्रभावीपणे वाढवणारी अत्यंत परिणामकारक उपचार पद्धती म्हणजे प्रतिजैविकांचा वापर न करता सुरक्षित सहाय्यक ‘ईकोलाय एलपीएस’ किंवा ‘ओएस्टर ग्लायकोजन’ औषधी. महाग आहे केवळ खरेदीसाठी पण एक प्रभावी उपचार किंमत तीनशे फक्त आणि एका खरेदीत ५० जनावरात उपचार करता येतात. याची उपलब्धतेबाबत मागणी करावी..
- पशुप्रजनन विनिमयन कायद्यांतर्गत पुन्हा पुन्हा रेतनाची नोंद झाल्यास कारणे मागवण्यात येत आहेत अणि तेव्हा दर तीन महिन्यात, तालुक्यात एका ठिकाणी, पारदर्शक पद्धतीत एका रेतमात्रेची प्रत पडताळणी होण्यासाठी आग्रह धरा.
- उलटणाऱ्या जनावरात गर्भाशय दाह नसेल तर स्त्रीबीज विकृती ओळखण्यास सोनोग्राफी तपासणी उपयुक्त ठरत असल्याने अशा तपासण्या मोठ्या प्रमाणात होतील यासाठी मागणी नोंदवनयत यावी.
- माजावर असणारी जनावरे भरविण्यासाठी दुर्बीण यंत्र उपलब्ध आहेत… तालुक्यात एक तरी असे यंत्र रेतन अचूकतेसाठी खरेदीसाठी आग्रह धरा.Breeding Management
- लिंगवर्धित रेतमात्रा वापरताना जनावरांच्या माजाबाबत अजिबात दोष नाही याची सखोल पडताळणी, तज्ञ पशुवैद्यकाकडून होण्यासाठी सजगता दाखवावि.
-
गोठ्यामध्ये गर्भाशय दाहाचे निदान
पद्धत १: माजचक्र कालावधी अभ्यासा.
निदान
माजानंतर ३ ते ८ दिवसास दिसून येणारा स्त्राव म्हणजे तीव्र गर्भाशयदाह तसेच माजानंतर १३ ते १७ दिवसानंतर दिसून येणारा स्त्राव म्हणजे कमी किंवा सौम्य तीव्र स्त्राव.
केवळ २१ दिवसापूर्वी ( दीड दोन दिवस कमी अधिक काळ शक्य). नोंद झालेल्या जनावरातच आज रेतन करा.
पद्धत २: बळसाचा रंग आणि वास पडताळा
निदान
संपूर्णपणे पारदर्शक, वासरहित, तार तुटणारा, चिकट स्त्राव अपेक्षित आणि रेतन योग्य तसेच मात्र पांढरट, धुरकट, पिवळट किंवा पारदर्शक स्रावामध्ये / शेवटी पांढरे भाग, अधिक पातळ स्त्राव आढळल्यास रेतन टाळा.
पद्धत ३: बळसाचा सामू तपासा
निदान
बळस हा शरीर क्रियेतील भाग असल्याने फक्त ७.० सामू अपेक्षित आणि तेव्हाच फक्त रेतन करावि.
बाजारातून सामू पेपर पट्टी मिळवा, एक पट्टी अर्धी करावी. अणि दुसरी अर्धी पट्टी नंतर वापरता येते.
योनीतून गळणारा तुटणारा बळस सामू पेपरवर चिटकवून होणारा रंग बदल प्रमाणकाशी तुलना करून सामू नोंद करा तसेच सामू बदल आढळल्यास रेतन टाळा.
आधुनिक युगात डिजिटल पीएच मीटर उपलब्ध आहेत, त्यांचा योग्य वापर वैयक्तिक आणि सामुहिक पातळीवर करता येणार आहे.

पद्धत ४: बळस परिक्षण करा
निदान
सोडीयम हायड्रोक्साइड या रसायनाची बाटली बाजारात मिळत असते. दहा टक्का या प्रमाणातील रसायन आणि योनीमार्गातून स्त्रवणारा बळस सम प्रमाणात एकत्र करा, थोडा गरम करा ( ५०-६० अंश सेल्सिअस).
बळस असणारा भाग पांढरा पांढरा असेल तर गर्भाशय दाह नाही अणि फिकट पिवळा झाला तर गर्भाशय दहाची शक्यता, दिसून येणारा पिवळा म्हणजे मध्यम प्रकारचा गर्भाशय दाह आणि गडद पिवळा म्हणजे तीव्र गर्भाशय दाह.Breeding Management
पिवळट रंग सौम्य, फिका, ठळक, गडद असताना रेतन नको आहे.
पद्धत ५: माजाच्या बळसाची काचपट्टी बनवा
निदान
माजाचा बळस योनीतून पडताना सरळ काचपट्टीवर घ्या,फक्त वाळवा आणि शहरातील माणसासाठी असणाऱ्या खासगी रोगनिदान प्रयोगशाळेत या काचपट्टीवर ग्राम स्टेन करावी.
पीएमएन पेशी म्हणजे अधिक केंद्रक असणाऱ्या पेशी संख्या किती याची नोंद करा अणि अशा पीएमएन पेशींची ५ टक्क्यांहून अधिक संख्या आढळल्यास हमखास सुप्त गर्भाशय दाह असल्याची खात्री होते.
– डॉ.नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१
( लेखक पशूतज्ज्ञ आहेत)