Biocapsule: तुम्हाला बायोकॅप्सूल खते माहिती आहेत का 2022 - डिजिटल शेतकरी

Biocapsule: तुम्हाला बायोकॅप्सूल खते माहिती आहेत का 2022

Biocapsule: तुम्हाला बायोकॅप्सूल माहिती आहेत? कॅप्सूल म्हणल की आपल्याला आपण आजारी पडल्यानंतर ज्या घेतो त्या औषधांच्या विविध रंगाच्या कॅप्सूल स्वरुपातील गोळ्या डोळ्यासमोर येत असतात.Biocapsule पण आता पिकांसाठीही आशाच कॅप्सूल उपलब्ध झाल्या आहेत आणि  हवं तर आपण याला पिकांचे टॉनिक ही म्हणू शकतो. ज्यामुळे जमिनीची सुपिकता वाढून उत्पादनात वाढ होत असते.

जमिनीची सुपिकता Soil Fertility ही त्यामध्ये असलेल्या सेंद्रिय घटकावर आणि उपयुक्त सुक्ष्मजीवावर ठरलेली  असते. मातीतून दिलेली किंवा उपलब्ध असलेली खते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम सूक्ष्मजीव करत असतात. त्यामुळे बीजप्रक्रिया Seed Treatment व आळवणीद्वारे सूक्ष्मजीवांचा समावेश असलेल्या (जैविक) खतांचा वापर केला जात आहे. जैविक खतामुळे (Organic Fertilizer) हवेतील नत्र शोषला जाऊन तो पिकांना उपलब्ध करून दिला जात आहे. अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते आणि  त्यामुळे जमिनीचा पोत सुधारून दर्जेदार उत्पादन मिळते. तर अशी ही जैविक खते उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्वाची आहेत आणि  ही जैविक खते आता कॅप्सूल (Capsule) स्वरुपात उपलब्ध झाली आहेत.

जमिनीची सुपिकता व काटेकोर शेतीचा ध्यास

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोझीकोडे (केरळ) येथील भारतीय मसाले संशोधन संस्थेने नॅनो तंत्रज्ञानावर आधारित “मायक्रोबियल इन्कॅप्सुलेशन” तंत्रज्ञानातून बायोकॅप्सूल खते विकसित केली  गेली आहेत. या मायक्रोबियल कॅप्सूलेशन तंत्राला पेटंटही मिळाले आहे आणि  जैव खत उद्योग जगतातील हे पहिले इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञान असल्याचा दावा येथील संशोधकांनी केला आहे.

रासायनिक खते टाळून  सेंद्रिय, जैविक खते वापराBiocapsule

बायोकॅप्सूलचा प्रसार होण्यासाठी रशियासोबत करार

या बायोकॅप्सूलचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी आणि या कॅप्सूलची उपयुक्तता शेतकऱ्यांच्या लक्षात येण्यासाठी भारतीय मसाले पिक संशोधन संस्थेने (आयआयएसआर) बायोकॅप्सूलच्या व्यापारीकरणासाठी रशियास्थित लिस्टर्रा एलएलसी या कंपनीशी सामंजस्य करारही केला गेला आहे. याशिवाय चार भारतीय कंपन्यांनी या इन्कॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून बायोकॅप्सूलच्या व्यावसायिक उत्पादनासाठी आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी भारतीय मसाले संशोधन संस्थेकडून यापूर्वीच परवाने मिळाले  आहे.Biocapsule

Biocapsule

बायोकॅप्सूल पिकांना अतिशय उपयुक्त असून कमी खर्चात उपलब्ध होतात. याची हाताळणी आणि साठवणूक सहजपणे करता येत असते. याशिवाय या बायोकॅप्सूल पर्यावरणपूरक असून यांची टिकवणक्षमताही चांगली राहत आहे.

हे हि वाचा : PM Kisan योजनेत चुकीचे बँक खाते किंवा आधार नंबरला घरी बसून करा दुरुस्त..

 

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

2 thoughts on “Biocapsule: तुम्हाला बायोकॅप्सूल खते माहिती आहेत का 2022”

Leave a Comment