जायफळ लागवड 2022 - डिजिटल शेतकरी

जायफळ लागवड 2022

जायफळ लागवड किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या, तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळ लागवड करत असतात. जायफळ लागवड पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन चांगली मानवत असते.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने जायफळाची “कोकण सुगंधा’ ही पहिली जात प्रसारित केली आहे. या जातीच्या पूर्ण वाढीच्या झाडापासून सरासरी 500-550  फळे वर्षाला मिळतात. या जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर येत असतात. नुकतीच विद्यापीठाने “कोकण स्वाद’ ही दुसरी जायफळाची जात प्रसारित केली आहे. या जातीपासून वर्षाला सरासरी 750-800  फळे मिळतात.

या झाडाची लागवड नारळाच्या किंवा सुपारीच्या बागांमध्ये करत असतात (सहा ते आठ मीटर अंतरावर). नारळाच्या बागेमध्ये नारळाच्या चार झाडांना चौफुलीवर 90-१००  सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. हे खड्डे चांगली माती व प्रत्येक खड्ड्यात 50-६०  किलो शेणखत / कंपोस्ट खत मिसळून भरून घ्यावेत.

भेट कलम, मृद्‌काष्ठ कलम, बगल कलम आणि अंकुर कलम या पद्धतींचा वापर करून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरता येत असतात. कलमे लावून लागवड केल्यामुळे आपल्याला मादी व नर झाडांचे आवश्‍यक प्रमाण (10ः1) राखता येत असते. तिसऱ्या व चौथ्या वर्षापासून उत्पादन मिळायला सूर होत असते.

तयार केलेल्या खड्ड्यामध्ये जून महिन्यात कलम लावून त्याच्या भोवतालची माती पायाने घट्ट दाबून घावी. रोपाची लागवड करावयाची झाल्यास एक ते दोन वर्षे वयाचे निरोगी रोप निवडावे  आणि तसेच कलमाद्वारे लागवड करावयाची झाल्यास कलमांचा जोड व्यवस्थित असल्याची खात्री करावी आणि लागवड करताना जोड जमिनीवर राहील याची काळजी घेण्यात यावी.

 

Leave a Comment