अकोला ः यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) जिल्ह्यात पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) लागू झाली असून आता आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्श कंपनीची (ICICI Lombard General Insurance Company) नेमणूक करण्यात आली आहे आणि यापूर्वीच्या कंपनीकडून हे काम काढून नव्याने देण्यात आले आहे.यंदा हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजना लागू करताना ‘बीड पॅटर्न’ (Beed Pattern) राबवला जाणार आहे. खरीप पिकांचा ३१ जुलैपर्यंत पीकविमा भरावा लागणार आहे आणि या योजनेच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय आढावा समिती राहणार आहे. यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी हे सदस्य, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत.
पीकविमा १५ जुलैपासून चालू करण्याचा प्रयत्न
ही समिती हंगामात दर १५ दिवसांनी प्रत्येक पिकाचे पेरणीक्षेत्र, हवामान परिस्थिती, किडी व रोगाचा प्रादुर्भाव, पिकांच्या नुकसानीचा अहवाल अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेला सादर करणार आहे. वैयक्तिकस्तरावर पंचनामे करण्यासाठी यंत्रणेची नियुक्ती करेल आणि लाभार्थी तपासणीबाबत कार्यवाही करेल. सोबतच योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी या समितीवर हि राहणार आहे. तर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.
तालुक्यांनाही तक्रार निवारण समिती
योजनेबाबत स्थानिक स्तरावरील विविध लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण स्थानिक स्तरावरच होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती राहणार आहे. ही समिती तहसीलदारांच्या अध्यक्षतेत काम करेल आणि समितीत गटविकास अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, दोन शेतकरी, अग्रणी बँक, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक प्रतिनिधी तसेच तालुका कृषी अधिकारी हे सदस्य सचिव राहतील.
खरीप हंगामातील पिके खालील प्रमाणे
ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस
Mala peak vimayachi Mahiti