देशातील असंख्य आधार कार्ड धारकांना (Aadhaar Card) त्यांनी आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन UIDAI ने केले गेले आहे. आधार कार्ड बनवताना त्यासंबंधी सर्व माहीती सायबर चोरांपासून संरक्षित ठेवण्यासाठी किंवा आधारचा गैरवापर(Aadhaar Card) टाळण्यासाठी युआयडीएआय ने महत्वाची माहीती दिलीली आहे.
UIDAI ने देशातील सर्व आधार कार्डधारकांना त्यांच्या आधार कार्डला ई-मेल आयडी (E-mail ID in Aadhaar) लिंक करण्यास सांगितलं जात आहे. भारतात काही नागरिकांकडे 10 वर्ष किंवा त्या आधीपासूनचे आधार कार्ड असल्याने त्यावेळेस फक्त नाव, मोबाईल नंबर, पत्ता अशी काही माहीती दिली जात होती परंतु तेव्हापासून देखील काहींनी बरीच माहीती अपडेट केलेली नाही, अशा नागरिकांना आपली माहीती नव्याने अपडेट करावी लागणार आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, आधार कार्ड (Aadhaar Card)तयार करण्याच्या वेळेस आपण मोबाईल नंबर दिला असेल आणि जर तो मोबाईल नंबर बंद झाला असेल किवा हरवला असेल तर नवीन मोबाईल नंबर आधारशी लिंक करण्यास यापूर्वी सांगितले जात होते. आता UIDAI ने आपल्याला आपला ई-मेल आयडी अपडेट करायला सांगितला जात आहे. आणि जेणेकरून तुम्हाला काही सूचना किंवा कोणी सायबर चोर तुमच्या आधारचा गैरवापर करत असेल तर तुम्हाला अलर्ट करण्यात येणार आहे.
आधार कार्डधारकांना (Aadhaar Card) त्यांच्या आधारचा गैरवापर होत आहे की नाही, याची माहिती ई-मेलद्वारे मिळू शकत आहे. E-mail ID आधार सेवा केंद्र मध्ये जाऊन अपडेट करावा लागणार आहे. तुमचा ई-मेल आयडी आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल आणि तुमच्या शहरातील आधार सेवा केंद्र https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या वेबसाईटवर क्लिक करून 3 आडव्या रेषांवर क्लिक करा आणि सर्च करा.
UIDAI ने ट्विट करून अशी माहीती दिली की, “तुम्ही आधारचा जिथे-जिथे वापर कराल आणि आयडी प्रूफ किंवा केवायसीसाठी जेव्हा आधार कार्ड वापरलं जाईल तेव्हा ई-मेल आयडी लिंक असल्याने तुम्हाला आधार संबंधित अपडेट मेलद्वारे त्वरित उपलब्ध होईल आणि जर काही गैरवापर होत असल्याचं आढळलंच तर सायबर क्राईममध्ये तुम्ही तक्रार करू शकता”, असं म्हटलं आहे.(Aadhaar Card)