loan: शेतकऱ्यांना दिवाळी भेट, राज्य सरकारकडून पुन्हा कर्जमाफीची घोषणा 2022 - डिजिटल शेतकरी

loan: शेतकऱ्यांना दिवाळी भेट, राज्य सरकारकडून पुन्हा कर्जमाफीची घोषणा 2022

loan: परतीच्या पावसामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली आहे. भूविकास बॅंकेतून शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज ( loan )माफ करण्यात आलं आहे. जवळपास 964 कोटी 15 लाख रुपयांची ही कर्जमाफी असेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात राज्यातील 7 लाख शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा (loan)निर्णय घेण्यात आला. अन्य निर्णय खालीलप्रमाणे :

राज्य सरकारचे मोठे निर्णय

▪️’एमपीएससी’च्या कक्षेबाहेरील गट-ब (अराजपत्रित), गट -क व गट-ड या पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून 75 हजार पदे भरणार.

▪️ वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंड माफ

▪️ 5G तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी धोरण.

▪️ मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचतगट निर्माण करणार. 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणार.

▪️ ‘महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क’ संस्थेस अनुदान देणार.

▪️ राजकीय व सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे खटले मागे घेणार.

▪️ माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ विभागातील राजपत्रित पदे ‘एमपीएससी’च्या कार्यकक्षेतून वगळणार.

▪️ आकस्मिक निधीच्या मर्यादेत 200 कोटींची तात्पुरती वाढ करणार.

▪️ साखर कारखान्यांची गाळप क्षमता प्रतिदिन 1250 मेट्रिक टनावरून 2500 मेट्रिक टनापर्यंत वाढविण्यासाठी भागभांडवल देणार.

हे हि वाचा : 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment