Onion: शेतकर्याचे नुकसान दिवाळीपूर्वी कांदा होणार स्वस्त, केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल 2022 - डिजिटल शेतकरी

Onion: शेतकर्याचे नुकसान दिवाळीपूर्वी कांदा होणार स्वस्त, केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल 2022

नवी दिल्ली: Onion गेल्या काही दिवसापासून देशात महागाई वाढली आहे तसेच खाद्यतेल, पालेभाज्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे आणि आता कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून सुमारे ५४,००० टन कांद्याची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. कांद्याच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडे सध्या २.५ लाख टन कांद्याचा Onion बफर स्टॉक शिल्लक आहे. सरकारने गेल्या आठवड्यातच राज्यांना कांद्याचा Onion पुरवठा सुरू केला होता आणि त्यामुळे आता काद्यांच्या वाढत्या दरांना ब्रेक लागणार आहे.

गुवाहाटी सारख्या काही शहरांमध्ये बफर स्टॉकमधून सुमारे ५०,००० टन कांदे उतरवणार असल्याचा अंदाज आहे  कारण जिथे कांद्याच्या किमती जास्त आहेत. गेल्या ५ वर्षात सरकारने कांद्याचा बफर स्टॉक विक्रमी पातळीवर वाढवला आहे तसेच, २०२१-२२ या आर्थिक वर्षात Onion सरकारने बफर स्टॉक म्हणून २.०८ लाख टन कांदा घेतला होता. पहिल्या व्यावसायिक वर्षात सरकारने १ लाख टन कांदा खरेदी केला आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस पाऊस पडत राहिला तर आवक मोठ्या प्रमाणात घटू शकत आहे. त्यामुळे दर झपाट्याने वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

जोपर्यंत नवीन पीक बाजारात येत नाही, तोपर्यंत कांद्याचे भाव वाढू शकतात आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नवीन कांद्याचे उत्पादन बाजारात येण्याची शक्यता आहे. याअगोदर कांद्याचा जुना साठा संपणार आहे सध्या या साठ्यातून पुरवठा केला जात आहे. त्यामुळेच कांद्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे असे काहीसे व्यापारी चे म्हणणे आहे.

हे हि वाचा : 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा

डिजिटल शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा👇

1 thought on “Onion: शेतकर्याचे नुकसान दिवाळीपूर्वी कांदा होणार स्वस्त, केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल 2022”

  1. खतांच्या किमती वाढल्या, शेतीसाठी लागणाऱे औजारे महाग झाले , सहा महिने कांदा दहा रुपये दराने खरेदी केला, आता कुठे विस ते पंचवीस रुपये दर झाले तर लगेच डोळ्यांमध्ये अऋ आले वा वा अच्छे दिन याला च म्हणतात. मोदी जिंदाबाद

    Reply

Leave a Comment