FD Post Offic पोस्ट ऑफिसमध्ये 5 वर्षांची एफडी
पोस्ट ऑफिसची एफडी हा निश्चित परताव्यासाठी एका चांगला पर्याय आहे आणि ही एफडीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे. यात आपल्याला एक, दोन, तीन, आणि पाच वर्षांचा पर्याय मिळतो. यासाठी आपण कुठल्याही पोस्ट ऑफिसामध्ये जाऊन कितीही अकाउंट सुरू करू शकता तसेच येथे एफडीसाठी किमान 200 रुपये आणि यानंतर, 200 रुपयांच्या पटीत पैसे असायला हवेत. आणि यात जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी, 5-वर्षांच्या कालावधीवर 7.5 टक्के एवढा व्याजदर आहे.
पाच वर्षांचे एनएससी
FD Post Offic राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात पाच वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो आणि यात आपण एकटे अथवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकता. ही योजना आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार, आयकर कपातीसाठीही चांगली आहे. या योजनेत व्याज दिले जात नाही, तर पुनर्गुंतवणूक केली जाते तसेच जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीसाठी 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिटवर 7.7% एवढा परतावा दिला जातो.