Fertigation Technology: पाण्यात विरघळणारी खतेठिबक सिंचन अथवा तुषार सिंचन द्वारे पिकांच्या मुळाजवळ गरजेनुसार परंतु रोज किंवा १-२ दिवसाआड देणे याला फर्टिगेशन असे म्हणत असतात. फर्टिगेशनमुळे मोजकीच खते पिकांच्या मुळांना मिळत असतात आणि खतांचा प्रभावी वापर होतो व अपव्यय टळतो.Fertigation Technology
फर्टिगेशनचे फायदे Fertigation Technology
१) झाडाची वाढ चांगली होत असते. पिकांना पाणी आणि अन्नद्रव्याचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादन वाढत असते.
२) फळाची गुणवत्ता वाढते आणि विद्राव्य खत वापरल्यामुळे खताची बचत होते.
३) पारंपरिक रासायनिक खते पाण्यात संपूर्णपणे विरघळत नाहीत.. परंतु हि खते पाण्यात संपूर्णपणे (१००%) विरघळतात त्यामुळे पिकांना ती लवकर उपलब्ध होत असतात.
४) पारंपरिक खतांमध्ये क्लोराईड व सोडियम सारखी हानिकारक मूलद्रव्ये आढळत असतात. त्यामुळे उत्पादन व फळाची प्रत कमी होत असते आणि तसेच या क्षारामुळे जमिनी खारवट व चोपणट होतात.
५) पारंपरिक खते मोठ्या प्रमाणात विकत घ्यावी लागत असतात. त्यांचा वाहतुकीचा खर्च खूपच जास्त असतो. वाहतूक करणेही जिकरीचे काम असते.. परंतु पाण्यात विरघळणारी खते हि अगदी कमी प्रमाणात घ्यावी लागतात आणि त्यामुळे वाहतुकीचा खर्च अगदी कमी असून वाहतूक करणे हि अगदी सोपे असते.
६) आम्लधर्मीय खतांचा पाण्यात नियमितपणे ठिबक मधून वापर करावा आणि त्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रित राहण्यास मदत होते.
७) वाढीच्या प्रत्येक अवस्थेत वेगवेगळ्या अन्न घटकांची आवशकता त्याचे व्यवस्थापन आपण केवळ फर्टिगेशन तंत्रामधूनच करू शकत आहे.
८) पारंपरिक रासायनिक खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरीत उपलब्ध होत नाहीत तसेच परंतु या खतामधील अन्नद्रव्ये झाडांना त्वरित उपलब्ध होतात.
९) पाण्याचा होणारा निचरा, बाष्पीभवन, स्थिरीकरण इ. कारणामुळे पारंपरिक रासायनिक खते झाडांना अगदी कमी प्रमाणात उपलब्ध होतात व बाकीची वाया जात असतात.
१०) बहुतेक पारंपरिक खते पाण्यात विरघळत नसल्यामुळे ती ठिबक संचातून आगर तुषार सिंचनातून देता येत नसतात.
११) पारंपरिक खते फार तर दोन किंवा चार भागात विभागून देतात परंतु विद्राव्य खते पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार अगदी नियमित देता येत असतात.
१२) विद्राव्य खते थेट पिकांच्या मुळ्याच्या कक्षेत दिली जात असतात.
१३) विद्राव्य खते आम्लधर्मीय असल्यामुळे ठिबक सिंचन संचात अगर तुषार सिंचन संचात क्षार साचत नाहीत आणि ड्रीपर किंवा नोझल चॉक होत नाहीत.
१४) विविध विद्राव्य खते एकमेकांमध्ये मिसळता येण्यास योग्य ठरत असतात.
१५) एकाच द्रावणातून नत्र, स्फुरद व पालाश हि तीनही अन्नद्रव्ये देता येत असतात.
१६) विद्राव्य खताच्या वापरामुळे हलक्या जमिनीतूनही अधिक उत्पादन मिळणे शक्य होत आहे.
फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी
साधारणतः जमीन रोज वापसा अवस्थेत राहील एवढेच पाणी झाडांना दिले पाहिजे.. कारण वापसा स्थितीतच वनस्पती, हवा, पाणी, अन्नद्रवे चांगल्या रीतीने घेऊ शकत आहे. पाण्याची मात्रा एकदा निश्चित केल्यावर विद्राव्य खते देण्याचा कालावधी निश्चित करावा लागतो. खते देण्याचा दर व कालावधी खते देण्याच्या साधनानुसार बदलत असतो आणि विद्राव्य खतांचा वापर एकूण सिंचनाच्या कालावधीच्या मधल्या कालावधीत करायचा असतो.Fertigation Technology
समजा आपण १२० मिनिटे ठिबक सिचन संच चालवीत असलो तर सर्व प्रथम ६० मिनिटे ठिबक सिंचन संचाद्वारे फक्त पाणी द्यावे लागते. नंतर ४० मिनिटे विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावीत आणि नंतर २० मिनिटे पुन्हा पाणी द्यावे. शेवटी पाणी एवढ्या करिता द्यावे लागेल कि जेणेकरून ठिबक सिंचन संचात खते साचून न राहता खताचा संपूर्ण मात्रा झाडाच्या मूळच्या मुळापर्यंत पोहचेल तसेच खते देण्याचे साधन कोणतेही असो किंवा कालावधी कितीही असला तरी खतांची तीव्रता हि पिकानुसार २०० ते ५०० पी.पी.एम. एवढी असावी.Fertigation Technology
एवढ्या तीव्रतेची खते पिकांना दिली तर पिके अन्नद्रवे घेऊ शकत असतात. त्यामुळे फर्टिगेशनच्या कालावधीला खूपच महत्व आहे आणि पिकांना जास्त पाणी देऊ नये. अन्यथा पाण्याबरोबर खतांचाही निचरा होऊन जाईल म्हणूनच पिकांना गरजे इतकेच पाणी देणे महत्वाचे ठरत असते. विद्राव्य खते फवारणी करण्यास योग्य असतात तसेच हे जरी खरे असले तरी पिकांना कोणत्या अन्नद्रव्याची गरज अशाच खतांची निवड करून मगच त्याची फवारणी करावी. फवारणी करताना त्याची तीव्रता पिकांनुरूप ७५०-१००० पी.पी.एम. एवढी असावी. Fertigation Technology
बी. जी. म्हस्के
सहाय्यक प्राध्यापक
डॉ. एन. एम. मस्के
प्राचार्य
एम. जी. एम. नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधेली, औरंगाबाद
९०९६९६१८०१
मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर