Gold Rate Today : भारतीय बाजारातील सोन्यावर आज मध्यपूर्वेतील तणाव आणि RBIच्या मौद्रीक धोरण समितीच्या निर्णयाचा परिणाम झाला अणि आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. जागतिक घडामोडींसोबतच उद्या होण्याऱ्या RBIच्या मौद्रीक धोरण समितीच्या निर्णयाच्या आधी सोन्याच्या भावात काही प्रमाणात घसरण दिसून आली होती . आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भाव घसरले असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे अणि चला पाहुयात काय आहेत सध्याचे दर Gold Rate Today…
सोन्याचा भाव
Goodreturnsच्या आकडेवारीनुसार राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरांमधील सराफा बाजारात 24 कॅरेटचा भाव सकाळी 820 रुपयांनी किंचित कमी होऊन प्रति तोळा 1,49,840 रुपये इतका झाला आहे. तर प्रति ग्रॅमचा भाव 14,984 रुपये इतका झाला आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट चा भाव आज प्रति 10 ग्रॅम 1,49,990 रुपये इतका इतका आहे.
- आजचा भाव उच्चांकाशी तुलना केल्यास 31 हजारांनी स्वस्त आहे तसेच एक महिन्याची तुलना करता 14 हजारांनी स्वस्त आहे.
- राज्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 1,37,350 रुपये तर प्रति ग्रॅम 13,735 रुपये इतका आहे.
- 18 कॅरेटचा भाव मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि राज्यातील इतर ठिकाणी जवळपास प्रति तोळा 1,12,380 रुपये इतका आहे.
- 18 कॅरेटचा प्रति ग्रॅम भाव 11,238 रुपये आहे.
Gold Silver Rate Today
कालपासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची बैठक सुरू आहे. उद्या व्याजदारबाबत समितीचा निर्णय येणार आहे तो सोन्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कमी व्याजदर असलेल्या परिस्थितीत सोन्याला अन्य उत्पन्न देणाऱ्या पर्यायांशी स्पर्धा कमी होते आणि सोन्याची मागणी वाढते त्यामुळे भाव वाढतात.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
MCX बाजार
आज सकाळी10 वाजता व्यवहारात MCX वर सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली तसेच सोन्याचा भाव 350 रुपयांनी कमी होऊन 1,49,625 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर सोन्याप्रमाणे चांदीमध्येही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव जवळपास 1,600 रुपयांनी घसरून 2,31,800 प्रति किलोवर आला.
चांदीचा भाव
आज राज्यभरात चांदीचा भाव प्रति किलो 2,50,000 रुपये इतका आहे तसेच आज सलग पाचव्या दिवशी चांदीचा भाव स्थिर आहे.
उच्चांकापासून चांदी 1.7 लाखांनी स्वस्त आहे
महिन्याभरात चांदी 35,000 रुपयांनी स्वस्त आहे.
बाजार तज्ञांच्या मते, सोनं-चांदीच्या भावांमध्ये या आठवड्यात मोठ्या प्रमाणात बदल होणार नाही, पण किंचित वाढीची शक्यता आहे अणि याचे मुख्य कारण आहे, अमेरिका-इराण संघर्ष. हा संघर्ष सुरू होऊन आता सहावा आठवडा सुरू झाला आहे त्यामुळे बाजारात अनिश्चितता असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत परिणामी किंमतींमध्ये अचानक बदल झालेला नाही.Gold Rate Today
शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा