Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय? - डिजिटल शेतकरी

Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?

Gold Silver Rate Today: आज सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली पहायला मिलत आहे. Gold Silver मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत सुमारे ४,७०० रुपयांची घसरण झाली, तर सोनंदेखील १,१०० रुपयांहून अधिक स्वस्त झालंय. ५ मे रोजी डिलिव्हरी होणारी चांदी मागील सत्रात २,३९,९१८ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती अणि( Gold Silver )आज ती २,३५,८५० रुपयांवर उघडली आणि सुरुवातीच्या व्यवहारात ४,७८५ रुपयांच्या घसरणीसह २,३५,१३३ रुपयांपर्यंत खाली आली. सकाळी ९:१५ वाजता चांदी ३,९३७ रुपये म्हणजेच १.६४ टक्क्यांच्या घसरणीसह २,३५,९८१ रुपयांवर व्यवहार करत होती,.
सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीतही घट दिसून आली आहे. MCX वर ५ जून रोजी डिलिव्हरी होणारं सोनं मागील सत्रात १,५१,७७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज ते १,१२९ रुपयांच्या घसरणीसह १,५०,६४७ रुपयांवर उघडलं. सकाळी ९:२० वाजता सोनं ७१३ रुपये म्हणजेच ०.४७ टक्क्यांच्या घसरणीसह १,५१,०६३ रुपयांवर ट्रेड करत होतं आहे.

सराफा बाजारातील स्थिती

यापूर्वी बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली होती तसेच अमेरिका आणि इराण दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमत झाल्यानंतर ही वाढ पाहायला मिळाली. परदेशी बाजारातील मजबूत कलचा देशांतर्गत बाजारातील व्यावसायिक मानसिकतेवर सकारात्मक परिणाम झाला व् अखिल भारतीय सराफा संघानुसार, सोन्याचा दर १.५६ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर चांदीची किंमत २.५१ लाख रुपये प्रति किलो झाली.Gold Silver

याव्यतिरिक्त, ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (IBJA) नुसार, बुधवारी बाजार बंद होईपर्यंत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५१,१२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली होती (यात ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत). ‘गुड रिटर्न्स’च्या आकडेवारीनुसार, अणि आता २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५३,८२० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेटचा दर १,४१,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा दर २,६०,००० रुपये प्रति किलो झाला आहे.

शेतकऱ्यांना आता दिवसा लाईट मिळणार
किमती का वाढल्या होत्या?

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे सराफा किमतींना बळकटी मिळाली होती, ज्यामुळे जागतिक वित्तीय बाजारपेठेत मोठी उभारी दिसून आली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे रिसर्च अॅनालिसिस्ट (कमोडिटी) सौमिल गांधी यांनी सांगितलं की, सोन्यातील मजबूती कायम राहिली आणि बुधवारी सोन्यानं तीन आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली तसेच जागतिक जोखीम घेण्याच्या वृत्तीत सुधारणा झाल्यामुळे डॉलर आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली, परिणामी मौल्यवान धातूंची मागणी वाढली.

*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*

Leave a Comment