Kikulogy: मान्सून पॅटर्न बदललेला असतांनाच ८०० कोटी जागतिक लोकसंख्येपैकी १५० कोटी भारतीय लोकसंख्येचे पोट भरण्याचे व अन्नसुरक्षिततेचे आव्हान आपल्यापुढं आहे आणि पृथ्वीवरील २१ टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार हे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानासह असते. जगातील एक लाख आर्थिक श्रीमंत व्यक्तींची यादी काढली तर सर्व लोक हे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीशी (Electronics)जोडलेले किंवा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगधंद्यात आर्थिक गुंतवणूक करीत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत आणि सर्व शिक्षणशाखा ज्ञानार्जन करण्यासाठी उत्तम आहेत. मात्र इलेक्ट्रॉनिक्स हा कृषी आर्थिक उन्नतीसाठी हायवे म्हणजे राजमार्ग होय.Kikulogy
रोबोटिक्स व कोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे आयओटी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय यांच्या वापरातून नवनवीन कृषी रोजगार उपलब्ध होत आहेत आणि आपला कृषी संपन्न आत्मनिर्भर भारत आपणच घडवायचा आहे, तो घडविण्यासाठी परग्रहावरून एलियन्स शेती करण्यासाठी येणार नाहीत. ते काम आपल्यालाच करायचे असते.Kikulogy
केंद्र सरकारने कृषी सुबत्ता असलेल्या नाशिक जिल्ह्यातील एक हजार एकर जमिनीवर ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर करीत इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड क्लस्टर बनवित नाशिक आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले गेले आहे, ज्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील युवापिढीने घेतला पाहिजे.
इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा(Electronics) अभ्यास करणाऱ्या युवक युवतींना स्वतः ॲग्रीइंडस्ट्री सुरू करण्याची व जगात श्रीमंत व्यक्ती होण्याची दुर्मिळ संधी आहे आणि आर्थिक, मानसिक, बौद्धिक, कृषी स्वावलंबनासाठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान हा विषय समजून घेणे व उपयोगात आणणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे कौशल्य विकासाने कृषी आत्मनिर्भर भारत घडेल आहे.
विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान अवगत करीत सामाजिक व राष्ट्रीय प्रश्न सोडविण्यासाठी ॲग्रीकल्चर इंडस्ट्री उभारावी आणि आत्मनिर्भर भारतासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान व कौशल्य विकसित करावे. वेगाने तंत्रज्ञान बदलत असतांनाच नैतिक मार्गाने नफा कमविणे हे पाप नाही हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे आहे.
ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीजचा खजाना!
ब्रेन टू कॉम्प्युटर इंटरफेसिंग म्हणजे बीसीआय, बिझनेस डेटा एनेलेटिक्स, मशीन लर्निग, फुल स्टॅक डेव्हलपमेंट, ब्लॉकचेन, क्लाऊड कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, डेवऑप्स, हायपर एटोमेशन, व्हर्च्युअल रियालिटी, एग्युमेंटेड रियालिटी, पीएलसी, स्काडा आदी विविध एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीजच्या एकत्रित वापरातून राष्ट्रीय व सामाजिक समस्या व शेतीतील तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी वापर आवश्यक आहे आणि अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट हे नजिकच्या वर्तमान आहे.Kikulogy