Land Record : पैसे देऊनही जमीन किंवा घर विक्रेते करतात रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ? तर कायदा काय सांगतोय 2022 - डिजिटल शेतकरी

Land Record : पैसे देऊनही जमीन किंवा घर विक्रेते करतात रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ? तर कायदा काय सांगतोय 2022

Land Record: लोकं त्यांच्या आयुष्यभराची कमाई मालमत्ता खरेदी करण्यासाठी गुंतवत असतात. मात्र, अनेकदा मालमत्तेची खरेदी करताना विक्रेत्याकडून अडवणूक केल्याच्या घटना घडल्या गेल्या आहेत. मालमत्तेचा संपूर्ण व्यवहार झाल्यानंतरही अनेकदा मालमत्ता विकणारी व्यक्ती रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत असते.

या समस्येचा सामना करण्यासाठी कायदेशीर तरतुदी दिल्या आहेत. दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसाठी तरतूद मालमत्ता विकणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे की खरेदीदाराकडून संपूर्ण रक्कम घेतल्यानंतर मालमत्तेवर लिखित मालकी हक्क खरेदीदाराला देणे म्हणजेच मालमत्तेची नोंदणी करणे होय परंतु, मालमत्तेचा विक्रेता पैसे घेऊनही मालमत्तेची नोंदणी करण्यास टाळाटाळ करत असेल किंवा खोटी आश्वासने देऊन टाळाटाळ करत असेल, तर तो कायदेशीर गुन्ह्याच्या कक्षेत येत असतो. अशी प्रकरणे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणांतून निकाली काढली जात असतात.Land Record

Land Record

अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, भारतीय दंड संहिता, 1860 मध्ये योग्य व्यवस्था करण्यात आली गेली आहे. यासाठी आयपीसी कलम 406 आणि 420 द्वारे शिक्षा दिली जाऊ शकते आणि आयपीसी कलम 406 या कलमांतर्गत, जर एखाद्याचा पैसा किंवा मालमत्ता चुकीच्या पद्धतीने किंवा फसवणूक करून हडप केली गेली असेल किंवा गंडा घातला गेला असेल तर तो गुन्हा दाखल आहे. या अंतर्गत दोषी व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकत असते.

आयपीसी कलम 420 अनेकदा बनावटगिरी, खोटे बोलणे, फसवणूक किंवा इतर तत्सम पद्धतींनी एखाद्याची मालमत्ता किंवा पैसा बळकावला गेल्यास या कलमाखाली शिक्षा दिली जात असते. मालमत्तेच्या मालकाने पैसे घेऊनही रजिस्ट्री न केल्यास पीडित व्यक्ती या कलमाखाली गुन्हा दाखल करू शकते आणि या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्या व्यक्तीला कठोर शिक्षेची तरतूद ग्केली आहे.Land Record

हे हि वाचा : मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर

कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घ्या..

पैसे देऊनही मालमत्तेची नोंदणी न झाल्यास, व्यावसायिक वकिलाचा सल्ला घेणे चांगले होईल आणि त्यामुळे कायदेशीर गुंतागुंत हाताळण्यास मदत होईल आणि तुमची बाजूही भक्कम होईल.Land Record

नोट: कायदे वेळोवेळी बदलत असतात तसेच वरील माहिती ही सध्याच्या कायद्यानुसार आहे आणि त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

हे हि वाचा : 1880 पासूनचे जमिनीचे सातबारे फेरफार ऑनलाईन डाऊनलोड करा

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment