Livestock Vaccination Sheep Farming Health Tips: शेळ्या, मेंढ्यांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास मरतूक होत असते. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय फायद्याचे ठरत असते. वेळापत्रकानुसार लसीकरण करणे फायदेशीर असते Livestock Vaccination .
शेळी, मेंढीपालनामध्ये संगोपनाइतकेच आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे तसेच आरोग्य व्यवस्थापनात दुर्लक्ष केल्यास कळपातील जनावरांना विविध आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि त्यामुळे तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कळपातील आजारी शेळ्यांवर उपचार केल्यास फायदेशीर ठरत आहे.
आजारी शेळ्यांची लक्षणे
- आजारी शेळ्यांची लक्षणे भूक, हालचाल मंदावते, रवंथ करणे थांबते, कळपापासून वेगळे राहण्याचा प्रयत्न करतात, धाप टाकत असते.
- लेंड्याचे प्रमाण कमी होऊन त्या घट्ट किवा जुलाब होतात, मूत्राच्या रंगात बदल दिसून येत असतो.
- नाकपुड्या कोरड्या पडतात, एखाद्यावेळेस शेळी लंगडने.
- अंगावरील केस ताठ होऊन कातड्याची चमक नाहीशी होत असते.
- शरीर तापमानात वाढ दिसून येते ani पाणी कमी पितात आणि दूध कमी होते. अशक्तपणा, तोल जाणे, या प्रकारची लक्षणेही दिसून येत असतात.
प्रतिबंधात्मक लसीकरण
- शेळ्यांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास मरतूक होते आणि यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे वेळेवर लसीकरण करून घेणे अतिशय म्हत्वाचे ठरते.
- प्रति जनावर लसीकरणासाठी (शासकीय पशुवैद्यकीयमार्फत) येणारा वार्षिक खर्च ५० रुपयांपेक्षा फार पेक्षा जास्त नाही.
- स्वखर्चातून एक शेळीला दर तीन महिन्यात एकदा असे वर्षातून चार वेळा जंत निर्मूलन, आवश्यकतेनुसार गोचीड निर्मूलन आणि ५ प्रकारच्या आजारांच्या लसीकरणासाठी एका शेळीला १२५ ते १५० रुपये खर्च येत असतो. वेळापत्रकानुसार लसीकरण करणे फायदेशीर ठरते.
मागील 150 वर्षांपासूनचे जमिनीचे सर्व जुने सातबारा फेरफार नोंदी पहा तुमच्या मोबाईलवर
संसर्गजन्य आजार
जिवाणूजन्य आजार ः आंत्रविषार, घटसर्प, धनुर्वात
विषाणूजन्य आजार ः पीपीआर, लाळ्या खुरकूत, देवी, ब्ल्यू टंग, मावा आजार.
Livestock Vaccination लसीकरणाबाबत शंका समाधान लसीकरणानंतर गाठी येतात का?
- पशुमध्ये लस टोचताना काही उणिवा राहिल्यास गाठी येऊ शकत आहे. कालांतराने या गाठी विरघळून जात असतात. जर गाठी तशाच त्वचेत राहिल्या तर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावे,.
- लसीकरण केल्यानंतर काही वेळा जनावरांच्या अंगावर गाठी येणे किंवा ताप येणे अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
- गाठ येते किंवा ताप येतो म्हणून लसीकरण टाळू नये आणि अशा गाठींमुळे जनावरांच्या जिवाला काही धोका होत नाही. त्यामुळे न घाबरता तत्काळ लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणामुळे शेळ्या गाभडतात का?
लस शरीरात टोचल्यानंतर काही काळानंतर शरीरात तापमान वाढ होत असते. लसीकरणामुळे गर्भाशयात वाढत्या गर्भास आयत्या स्वरूपात आजाराविरुद्ध प्रतिकार शक्ती प्राप्त होत असते. म्हणून गाभण जाण्यापूर्वीच शेळ्या-मेंढ्यांना लस टोचून घेणे फार आवश्यक आहे.Livestock Vaccination
लसीकरणाने जनावरे गाभडत नाहीत आणि मुळांत गाभडण्यामागे जनावरांतील प्रतिकारशक्ती आणि इतर असंसार्गिक व पोषणाशी संबंधित कारणे असू शकतातLivestock Vaccination .