Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता 2026 - डिजिटल शेतकरी

Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता 2026

Maharashtra Summer Weather: राज्यातील वादळी पावसाने उघडीप देताच, उन्हाचा चटका प्रचंड वाढू लागला आहे. आज (ता. ७) पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली गेली आहे Maharashtra Heatwave Alert.

ईशान्य विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. ६) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये आंध्र प्रदेशातील तिरूपती येथे देशातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उत्तर प्रदेशातील हरदोई, नजीबाबाद आणि हरियाणाच्या कर्नाल येथे नीचांकी १४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे ..

वादळी पावसाला पोषक हवामान; राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज कायम

अंशतः ढगाळ हवामान होत असल्याने राज्याच्या तापमानात चढ-उतार होत आहे अणि किमान तापमानात काही अंशी घट झाल्याने काही ठिकाणी रात्री गारठा जाणवू लागला आहे. सोमवारी (ता. ६) सोलापूर आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.Maharashtra Heatwave Alert

आज (ता. ७) पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे तसेच तर उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. राज्यात उकाडाही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला गेला आहे.Maharashtra Heatwave Alert

सोमवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
‎ठिकाणे—तापमान कमाल—तापमान किमान

‎पुणे—३३.७—१७.८

अहिल्यानगर—निरंक—१६.७

धुळे—३५.०—१६.०

जळगाव—निरंक—२१.७

जेऊर—३६.५—१८.०

‎‎कोल्हापूर—३५.०–१९.१

‎महाबळेश्वर—२७.५—१३.९

मालेगाव—३७.०—१७.८

नाशिक—३१.५—१७.९

निफाड—३३.२—१६.६

‎सांगली—३६.४—१८.७

‎सातारा—३४.६—१७.७

‎सोलापूर—३७.९—२२.१

‎सांताक्रूझ—३३.३—२२.९

डहाणू—३१.८—२१.६

रत्नागिरी—३३.०—२१.६

‎छत्रपती संभाजीनगर—३५.०—१९.६

धाराशिव—निरंक—१९.९

परभणी—३६.६—२१.६

परभणी (कृषी)—३७.०—१८.६

अकोला—३७.९—२२.०

अमरावती—३७.२—१९.९

भंडारा—३६.०—२१.०

बुलडाणा—३७.०—२२.४

‎ब्रह्मपुरी—३७.६—२३.३

video
‎चंद्रपूर—३६.६—२४.६

‎गडचिरोली—३६.२—२२.४

‎गोंदिया—३५.५—२२.०

‎नागपूर—३४.४—१९.२

‎वर्धा—३७.०—२२.०

‎वाशीम—३५.८—२१.८

‎यवतमाळ—३६.०—२१.४

‎सरासरी तापमान (अंश से.)

‎विभाग—किमान—कमाल

‎उत्तर महाराष्ट्र—१६.०—३७.०

‎पश्‍चिम महाराष्ट्र—१३.९—३७.९

‎मराठवाडा—१८.६—३७.०

‎विदर्भ—१९.२—३७.९

‎कोकण—२१.६—३३.३

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

गडचिरोली, चंद्रपूर.

नाशिक ५२ हजारांची लाच घेताना गटशिक्षणाधिकाऱ्यासह तिघे जाळ्यात

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा

Leave a Comment