Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ - डिजिटल शेतकरी

Rain Alert: राज्यात वादळी पावसाचा इशारा; वर्धा, यवतमाळ,चंद्रपूरमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’

Rain Alert  राज्याच्या काही जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे तसेच आज (ता. १७) राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला गेला आहे Rain Alert.

गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत आणि राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाने तडाखा दिला आहे. कोकणातील पालघर, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, मराठवाड्यातील लातूर, तसेच विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांत विविध ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार सुरू आहेत.

दस्तनोंदणीसाठी मोजणी नकाशा बंधनकार

शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. ‎ब्रह्मपुरी येथे ४० अंशांपेक्षा अधिक, तर ‎‎‎‎अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. धुळे, ‎जळगाव, ‎‎सोलापूर, ‎‎परभणी, ‎नागपूर, ‎वर्धा, ‎वाशीम, ‎यवतमाळ येथे पारा ३७ अंशांच्या वर होता…

आज (ता. १७) संपूर्ण विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला गेला आहे. तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे आणि उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.

मॉन्सून ‘जैसे थे’

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. १५) दक्षिण अरबी समुद्रासह, मालदीवचा काही भाग, श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली आहे आणि अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मॉन्सूनने चाल केली आहे. शुक्रवारी मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ होती. वाटचालीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागासह, संपूर्ण अंदमान बेटांवर मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

Rain Alert

शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी Whatsapp ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment