Relationship: आर्थिक आत्मनिर्भर होण्यासाठी काय करायला हवे?
१. कुटुंब व्यवस्थापन आणि अर्थार्जनाची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या भारतीय स्त्रियांनी आता कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारीही तितक्याच सहजतेने उचलायला हवी आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे ती नवरा – बायकोमध्ये आर्थिक बाबींवर सामंजस्य असण्याची!
२. भारतात बव्हंशी घरात रोजचे बजेटिंग, दैनंदिन खर्च ह्यांची जबाबदारी स्त्रियाच सांभाळताना दिसतात आणि परंतु, घरातील मोठे आर्थिक निर्णय (जसे की होम लोन घेणे, ते मॅनेज करणे, इतर छोटे-मोठे लोन्स घेणे आणि मॅनेज करणे, इन्वेस्ट्मेन्ट्स प्लानिंग इत्यादी) घेताना मात्र स्त्रियांचा सहभाग नगण्य आहे.
३. हे चित्र बदलण्यासाठी आर्थिक बाबतीत पती-पत्नीच्या नात्यात मोकळा संवाद महत्त्वाचा आहे आणि आर्थिक उद्दिष्टे, प्राधान्यक्रम आणि चिंतांवर मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करणे महत्त्वाचे आहे.
४. एकमेकांशी संवाद साधून अंदाजपत्रक बनवणे आणि आर्थिक नियोजनाचे प्लानिंग करणे यामुळे कुटुंबातील व्यक्तींचे सामायिक खर्च आणि वैयक्तिक खर्च यांचा योग्य अंदाज बांधता येतो तसेच पती व पत्नी दोघांनीही मोठ्या आर्थिक निर्णयांची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यात सहभाग घेतला पाहिजे.
५. कुटुंबाची सामायिक आर्थिक उद्दीष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने पतीपत्नींमधील आर्थिक बाबींवरचा संवाद निश्चितच उपयुक्त ठरू शकतो आणि आर्थिक बाबींवरची पारदर्शकता कुटुंबात विश्वासाचे वातावरण निर्माण करते आणि यामुळे एकता आणि सामायिक जबाबदारीची भावना वाढीस लागते.
६. आर्थिक आव्हाने किंवा अपयशाच्या वेळी संपूर्ण कुटुंबाने एकजुटीने उभे राहणे खूप महत्त्वाचे आहे तसेच दोषारोप करण्याऐवजी एक टीम म्हणून आर्थिक अडचणींचा सामना केल्यास पारदर्शकता आणि मजबूत संबंध निर्माण होऊ शकतात.Relationship
७. शेवटी आर्थिक शिक्षण, संसाधनांची उपलब्धता आणि कौशल्य विकासाच्या संधींद्वारे स्त्रियांचे सक्षमीकरण केल्यास त्यांचा आर्थिक आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य आणखी वाढू शकत आहे. Relationship
हिवाळ्यात रोज १ पेरू खा; ८ गुणकारी फायदे- वजन कंट्रोलमध्ये येईल, पोट नेहमी साफ राहील
1 thought on “Relationship : नवरा पैशाचे व्यवहार करतो आणि बायकोला काहीच माहिती नसते? संसारात अशी ‘गुप्तता’ योग्य नाही कारण..”